मिरज : खबऱ्या प्रतिनिधी/ मिरजेतील ज्येष्ठ नेते माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटी तसेच विजयराज व विजयश्री निरंजन आवटी यांचा दिनांक १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त मिरज मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवार दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता मोटरसायकल बरोबर म्हैस व रेडू शर्यत स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक २१ हजार, द्वितीय क्रमांक १५ हजार, तृतीय क्रमांक ११ हजार रुपये, यासह लहान गटासाठी रोख रक्कम बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या स्पर्धेसाठी सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील म्हैसधारक सहभागी होणार आहेत. तसेच सायंकाळी ४ वाजता भव्य राज्यस्तरीय हलगी वादन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी रोख बक्षीस ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील हलगी वादक येणार आहेत. दिनांक १२ डिसेंबर रोजी दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून यामध्ये आरोग्य शिबिर, अनाथ आश्रम येथे खाऊवाटप तसेच सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर येथील प्रसिद्ध डान्स म्युझिकल नाईट मराठी – हिंदी गाण्यासह धमाल डान्सचे आयोजन केले आहे. हे सर्व कार्यक्रम एकता चौक, कमान वेस, मिरज येथे संपन्न होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश (बापू) आवटी यांनी केले आहे.

