• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | ग्रामीण पोलिसांकडून “त्या’ टोळीला अटक : “सायबर’ पोलिसांचीही मदत

Admin by Admin
December 10, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरज | ग्रामीण पोलिसांकडून “त्या’ टोळीला अटक : “सायबर’ पोलिसांचीही मदत
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी/रानवस्तीवर गोठ्यात बांधलेल्या संकरित गायींची चोरी करणारी सहा जणांची टोळी मिरज ग्रामीण पोलीसांनी गजाआड केली असून त्यांच्याकडून बेडग परिसरात चोरीस गेलेल्या सहा दुभत्या गायी हस्तगत करण्यात यश आले आहे.ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.

दिवाळी नंतर बेडग, आरग, मालगाव परिसरातील रानवस्तीवर गोठ्यातून संकरित दुभत्या गायींची चोरी होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या चोरीचा तपास करीत असताना गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या कर्मचार्‍यांना या गायींची चोरी करून कमी किंमतीत या गायींची विक्री नरवाड, सांगोला, कर्नाटकातील सीमावर्ती गावात केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पडताळणी केली असता म्हैसाळमध्ये संकरित गाय नव्याने खरेदी केली असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. या गायीच्या खरेदीबाबत चौकशी केली असता या चोरीचा उलगडा झाला.

या प्रकरणी प्रतिक कोळी (वय २१, बेडग), राकेश शिंदे (वय २४, म्हैसाळ), आकाश उर्फ बापू मासाळ (वय २३, बेडग), प्रकाश उर्फ बापान्ना मासाळ (वय २४, बेडग), किशोर उर्फ अण्णा शेळके (वय २३, बेडग) आणि राकेश आवळे (वय ३१, म्हैसाळ) या सहा जणांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सहा संकरित दुभत्या गायी, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला लहान टेम्पो (एमएच १० सीआर ०५८२) हस्तगत करण्यात आला आहे.

Previous Post

अवैध वाळू तस्करी करताना पकडलेले वाहन तस्करांनी पळवले

Next Post

आख़िर कौन है धीरज साहू , जिनके ठिकानों से छापे में मिले लगभग 300 करोड़ रुपये?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आख़िर कौन है धीरज साहू , जिनके ठिकानों से छापे में मिले लगभग 300 करोड़ रुपये?

आख़िर कौन है धीरज साहू , जिनके ठिकानों से छापे में मिले लगभग 300 करोड़ रुपये?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group