• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दुय्यम निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात.

Admin by Admin
December 7, 2023
in क्राईम
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बियर दुकानाच्या परवान्यासाठी लाच मागणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाविरोधात पालघर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे नावे बियर दुकानाचा परवाना मिळवण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये पालघर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात अर्ज दिला होता.

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात दुय्यम निरीक्षक पदावर असलेल्या नितीन बाबू संखे यांनी तक्रादाराने दिलेल्या अर्जावर कार्यवाही करून त्यांना बियर दुकानाचा परवाना देण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे चार लाख रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविरोधात २० नोव्हेंबर रोजी पालघर लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले. दुय्यम निरीक्षक नितीन संखे यांनी तक्रारदाराने दिलेल्या अर्जावर कार्यवाही करून त्यांना बिअर दुकानाचा परवाना देण्याकरिता प्रथम चार लाख आणि त्यानंतर तडजोड करून तीन लाख चाळीस हजार रुपये लाच म्हणून स्वीकारण्याचे मान्य केले असल्याने त्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती लाचलुचपत विभागाने दिली आहे.

Previous Post

BREAKING | मंगळवेढ्यात १९ मुलांना विषबाधा ; मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय व सोलापूर सिव्हील येथे उपचारासाठी दाखल

Next Post

BIG BREAKING🔥 | गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकली, मराठा आंदोलक आक्रमक..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

BIG BREAKING🔥 | गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकली, मराठा आंदोलक आक्रमक..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group