• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज पूर्व भागातील शेतकऱ्याने….वाचा सविस्तर..!

Admin by Admin
December 7, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस धुमाकूळ घातलेल्या पावसाने मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, तासगाव व जत या सर्व द्राक्ष पट्ट्यात अक्षरशः कहर केला. द्राक्षघड कुजून, बुरशी येऊन खराब झाले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील बंडगरवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी या भागातील अनेक शेतकर्‍यांनी खराब द्राक्षांचे घड आपल्याच शेतात दोन ओळींच्यामध्ये चरीत पुरले आणि खोरे व ट्रॅक्टरच्या मदतीने मुजवले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील बंडगरवाडी, शिंदेवाडी या भागातील वीसभर शेतकर्‍यांना हाच मार्ग अवलंबावा लागल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकरी अनिल श्रीपती बोदगिरे (शिंदेवाडी – एच) यांनी दिली. तासगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी ओढ्यात द्राक्षे टाकली. मिरज तालुक्यातील शेतकर्‍यांनी बांधावर, रस्त्यावर टाकली. कुणी द्राक्षे तशीच शेतात सोडली. मिरजपूर्व भागातील सलगरे, चाबुकस्वारवाडी भागात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. तसेच खटाव, लिंगनूर, मगदूमवाडी भागातही तलाठी व कृषी खात्यामार्फत पंचनामे सुरू केले आहेत.

सलगरे येथील बेळंकी रोडवरील एका द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची दीड एकर सुपर सोनाक्का जातीच्या द्राक्षाची बाग पावसाच्या एक दिवस आधी व्यापार्‍यांनी ठरवली होती. 290 रुपये पेटी म्हणजेच चार किलोला हा दर ठरवला होता. अवकाळी पाऊस पडताच दिल्ली मार्केटला क्रॅक द्राक्षे चालत नाहीत, असे कारण सांगून याच द्राक्षांचा दर व्यापार्‍यांनी 75 रुपये पेटी असा केला. पावसाच्या तडाख्यातून वाचलेले घड आणि ज्या घडातील दोन-चार मणी क्रॅक झाले ते काढून उरलेली द्राक्षे नेतो, असे सांगितले आणि उरलेले द्राक्ष घड तसेच सोडून गेले.

Previous Post

मिरज | “या’ पोलीस ठाण्यात कर्मचारी कमी ; पण देतात सुरक्षेची हमी..! गुन्हेगारांच्या ‘डेपो’त ६८ कर्मचाऱ्यांवर भार

Next Post

सांगली | पत्नीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न ; घोडावत विरोधात गुन्हा दाखल.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पत्नीचा छळ; सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा

सांगली | पत्नीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न ; घोडावत विरोधात गुन्हा दाखल.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group