• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सावळीत कोल्ड स्टोअरेजमध्ये बॉयलरचा स्फोट ; एकाचा मृत्यू

Admin by Admin
December 4, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सावळीत कोल्ड स्टोअरेजमध्ये बॉयलरचा स्फोट ; एकाचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड : खबऱ्या प्रतिनिधी/सावळी (ता. मिरज) येथील तानंग रस्त्यालगत असलेल्या श्रीनिधी ग्रो प्रोसेसिंग अ‍ॅन्ड कोल्ड स्टोअरेजमधील बॉयलरच्या स्फोटात नातूसिंग ग्यानसिंग भदोडिया (वय 58, रा.मूळगाव बिहार, सध्या रा. सावळी) या परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. बॉयलरच्या स्फोटाने दोन किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : सावळी-तानंग रस्त्यालगत असलेल्या श्रीनिधी ग्रो प्रोसेसिंग अ‍ॅन्ड कोल्ड स्टोअरेजमध्ये रविवारी दुपारी अचानक बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात बॉयलर कामगार नातूसिंग भदोडिया हा गंभीर जखमी झाला. स्फोटात बॉयलरचे संपूर्ण शेड जमीनदोस्त झाले. स्फोटाने शेडवरील पत्रे लांब उडून गेले. कोल्ड स्टोअरेजमधील काचेच्या खिडक्या, पत्रे, दरवाजे आदींचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्फोटात गंभीर जखमी झालेला परप्रांतीय कामगार हा ठेकेदारामार्फत काम करीत असल्याचे कामगारांनी सांगितले. सदरचा कामगार हा कोल्ड स्टोअरेजमधील एका खोलीत राहत होता. जखमीस काही कामगारांनी तातडीने सांगलीतील एका दवाखान्यात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना काही तासांतच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे पोलिस पथकासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे.

Previous Post

कुपवाड | बारा बलुतेदारांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी विश्वकर्मा योजना – प्रकाश ढंग : भाजपाच्यावतीने उज्वला गॅसचे वाटप

Next Post

खंडेराजुरीत कामगार-भाजप समर्थकांत वादावादी; दगडफेक, मारहाण केल्याचा कामगारांचा आरोप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खंडेराजुरीत कामगार-भाजप समर्थकांत वादावादी; दगडफेक, मारहाण केल्याचा कामगारांचा आरोप

खंडेराजुरीत कामगार-भाजप समर्थकांत वादावादी; दगडफेक, मारहाण केल्याचा कामगारांचा आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group