कुपवाड : खबऱ्या प्रतिनिधी / केंद्र शासनाने बारा बलुतेदारांच्या विकासासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विश्वकर्मा योजना, स्वनीधी योजनेसह इतर महत्त्वाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले.
कुपवाडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पंचायतराज व ग्रामविकास विभागाच्यावतीने शहरातील भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे नेते श्रीकांत शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष अमोल थोरवे,शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, भाजपा पंचायत राजच्या गितांजली ढोपे- पाटील, उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी उज्वला गॅस योजने अंतर्गत महिला लाभार्थ्यांना ढंग यांच्या हस्ते उज्वला गॅसचे वाटप करण्यात आले. यावेळी ढंग म्हणाले की, केंद्र शासनाने बारा बलुतेदारांच्या विकासासाठी विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा. तसेच या योजनेबरोबरच स्वनीधी योजना आणि इतर महत्त्वाच्या योजनांचाही लाभ घ्यावा.
या कार्यक्रमास प्रकाश पाटील, रविंद्र वादवणे, संग्रामसिंह शिंदे, मच्छिंद्र व्हनकडे,रेखा इंगळे, स्मिता भाटकर, गायत्री डोर्ले आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

