• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | पोलीस अधिक्षकांपासून इतर विभागांचेही कामकाज चालणार आता ‘ इथे ‘..! वाचा सविस्तर

Admin by Admin
December 3, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली | पोलीस अधिक्षकांपासून इतर विभागांचेही कामकाज चालणार आता ‘ इथे ‘..! वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : गोपनीय खबऱ्या प्रतिनिधी/ जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर विश्रामबागला १९६७ मध्ये सध्याचे पोलिस मुख्यालय उभारण्यात आले होते. आतापर्यंत इमारत जीर्ण झाल्याने व पोलिस दलाचाही विस्तार झाल्याने नवीन इमारतीची मागणी होत होती. त्यानुसार या इमारतीचे काम सुरू करण्यात आले. ठेकेदारानेही दिलेल्या निर्धारीत वेळेत काम पूर्ण करून दिले होते.

सांगली शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयाची इमारतीमुळे प्रशासकीय वैभवात भर पडली होती. मात्र, इमारत पूर्ण होऊनही त्यातून कामकाज होत नव्हते. जिल्ह्यातील इतर विकासकामांसह या इमारतीचेही उदघाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, तीनवेळा ठरलेला मुहूर्त लांबणीवर पडला होता. अखेर गृह विभागाने कामकाज सुरू करावे उदघाटनाबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल असे प्रशासनाला कळवले होते. त्यानुसार शुक्रवारपासून जून्या इमारतीमधील सर्व विभाग स्थलांतरी करण्यात येत होते. सोमवारपासून सर्व काम सुरू होईल. काही विभागाचे दप्तर येण्यास विलंब लागणार असल्याने गुरूवारपासून पूर्ण कामकाज नवीन इमारतीमधून होणार आहे.

सांगलीच्या वास्तू वैभवात भर घालणारी नुतन पोलिस अधीक्षक कार्यालयाची इमारत पूर्ण होऊन चार महिने झाल्यानंतर अखेर कामकाजाला मुहूर्त सापडला आहे. आज, सोमवारपासून पोलिस अधीक्षक कार्यालयात कामकाज सुरू होणार आहे.

इमारत पूर्ण होऊनही उदघाटनाअभावी स्थलांतर थांबले होते. अखेर उदघाटन नंतर करू आता कामकाज सुरू करा, असे निर्देश शासनातर्फे देण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या गुरूवारपर्यंत सर्व कामकाज नवीन इमारतीमधूनच सुरू होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली. दरम्यान, पोलिस अधीक्षक कार्यालयाचे काम पूर्ण होऊनही केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उदघाटन रखडल्याने इमारत धूळखात पडली होती.

Previous Post

कारागृहातून दरोड्याची सूत्रे चालायची : सूत्रधाराला बिहारमधून अटक : ‘द ग्रेट’ सांगली पोलीस..!

Next Post

कुपवाड | बारा बलुतेदारांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी विश्वकर्मा योजना – प्रकाश ढंग : भाजपाच्यावतीने उज्वला गॅसचे वाटप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाड | बारा बलुतेदारांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी विश्वकर्मा योजना – प्रकाश ढंग : भाजपाच्यावतीने उज्वला गॅसचे वाटप

कुपवाड | बारा बलुतेदारांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी विश्वकर्मा योजना - प्रकाश ढंग : भाजपाच्यावतीने उज्वला गॅसचे वाटप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group