• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Pandharpur | यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; ६५ एकरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध

Admin by Admin
November 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
Pandharpur | यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; ६५ एकरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा गुरुवारी (दि. २३) साजरा होत आहे. या साेहळ्यासाठी संताचे लहान मोठे पालखी सोहळे पंढरपूर नजीक दाखल झाले आहेत. तर येथील ६५ एकर येथे देखील लाखांवर भाविक दाखल झाले आहेत.

येथील ४९७ पैकी २७८ प्लॉटचे बुकींग देखील पुर्ण झाले आहे. भाविक राहुट्या, तंबू, मंडप उभारुन वास्तव्य करु लाागले आहेत. ६५ एकरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. कार्तिकी यात्रेसाठी चंद्रभागात नदीवाळवंटात उभारण्यात येत असलेल्या राहुटयांना चंद्रभागा नदीपलीकडील ६५ एकरात दिंड्यांना राहण्यासाठी प्रशासनाकडून जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

येथील सर्वच्या सर्व ४९७ प्लॉटचे वाटप करण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. २१) दुपारी २७८ प्लॉटचे वाटप करण्यात आले असून १०६ दिंड्या दाखल झाल्या आहेत. तर येथे १ लाख ९० हजार १० भाविक दाखल झाले आहेत. सध्या तंबू, राहुट्या उभारून भाविक येथे वास्तव्य करत आहेत. भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले असल्याने भक्ती सागर विठ्ठल भक्तीत दंग झाल्याचे चित्र दिसून येते.

पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने परिसरात कायम स्वरुपाची ८०० शौचालये तर तात्पुरती ४०० शौचालये उभारण्यात आली आहेत. पिण्यासाठी नळाव्दारे पाणी, पाण्याचे टँकर उभारण्यात आले आहेत. तर लाईटची सुविधा मोफत दिली आहे.

विजवितरणकडून २० जोडण्या देण्यात आल्या आहेत. तर गॅस जोडणी देखील देण्यात येत अाहे. ६५ एकर येथे सुरक्षा, वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्याने भाविकांची गैरसोय थांबली आहे.

भक्तीमय वातावरण तयार..

भजन, किर्तनाची सेवा येथेच केली जात असल्याने भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. येथे अत्यावश्यक सेवासुविधा पुरवण्याबरोबर खासगी दुकानदारांनी प्रासादिक साहित्याची दुकाने, हॉटेल, खेळणी आदींची दुकाने उभारण्यात आली आहेत.

आपत्कालीन मदत केंद्र कार्यरत..

सोमवारपासून ६५ एकर परिसरात दिंडया वास्तव्यास येवू लागल्या आहेत. भाविक तंबू, राहुट्या उभारत या ठिकाणी भाविक वास्तव्य करु लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून येथे भाविकांना मोफत जागा, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, प्रथमोपचार सेवा, पोलिस संरक्षण आदी सुविधा पुरण्यात आल्या आहेत. भाविकांना २४ तास सेवा देण्यासाठी येथे आपत्कालीन मदत केंद्र कार्यरत ठेवण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.

Previous Post

ब्रेकिंग | ऊस आंदोलनाची तीव्रता वाढणार ; सरकारसाेबती ऊस दराची चर्चा ठरली निष्फळ..

Next Post

कार्तिकीसाठी पंढरीत लाखाे भाविक दाखल ; मराठा समाजाने आंदोलन मागे घेतल्याने महापूजेचा पेच सुटला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कार्तिकीसाठी पंढरीत लाखाे भाविक दाखल ; मराठा समाजाने आंदोलन मागे घेतल्याने महापूजेचा पेच सुटला

कार्तिकीसाठी पंढरीत लाखाे भाविक दाखल ; मराठा समाजाने आंदोलन मागे घेतल्याने महापूजेचा पेच सुटला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group