• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सातारा – कास रस्त्यावर अपघातात अतीतचा एकाचा मृत्यू

Admin by Admin
November 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सातारा – कास रस्त्यावर अपघातात अतीतचा एकाचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सातारा ते कास रस्त्यावर आज मंगळवारी दि. 21 रोजी दुपारी कासाणी गावानजीक वळणावर दुचाकी घसरुन खाली पडल्याने झालेल्या अपघातात गणपतराव रतन कांबळे (वय 53, रा. अतित, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला.

तर दुचाकीचालक जखमी झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या घटनेमध्ये नागठाणे येथील बळीराम बाजीराव साळुंखे (वय 48) व गणपतराव कांबळे (रा. अतित) हे दोघे दुचाकीवरुन बामणोलीला चालले होते. सातारा ते कास रस्त्यावर कासाणी गावाच्या हद्दीत वळणावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावर पडली. यावेळी पाठीमागे बसलेले गणपतराव कांबळे तसेच बळीराम साळुंखे दोघेही रस्त्यावर पडले. त्यात गणपतराव कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर बळीराम साळुंखे जखमी झाले होते.

अपघातानंतर तेथून निघालेल्या वन विभागाच्या वाहनाने त्यांना तातडीने मदत केली. बळीराम साळुंखे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताची घटना कळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. दुचाकी निष्काळजीपणे चालवून कांबळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालक बळीराम साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार वायदंडे तपास करत आहेत.

Previous Post

सांगली | जिल्ह्यातील ‘या” तालुक्यात ३१ गावांना टँकरने पाणी..

Next Post

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच, चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच, चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच, चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group