• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज अर्बन बँक अखेर इतिहास जमा; अंतिम सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब

Admin by Admin
November 20, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरज अर्बन बँक अखेर इतिहास जमा; अंतिम सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / मिरज अर्बन बँकेच्या अवसायनाची मुदत संपल्याने नोंदणी रद्द करण्यासाठी अंतिम सर्वसाधारण सभा पार पडली. नोंदणी रद्द न करता बँकेची पतसंस्था करावी. बड्या कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करून एकरकमी कर्जफेड योजना सुरू ठेवावी आदी ठराव अंतिम सभेत करण्यात आले.

सुमारे ७४ वर्षांपूर्वी स्थापन झालेली मिरज अर्बन बँक इतिहासजमा होऊन बँकेवर परिसमापक येणार आहे.

६० कोटी कर्ज घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या मिरज अर्बन बँकेवर १५ वर्षांपूर्वी अवसायक नियुक्ती झाली. सहकार विभागातर्फे चौकशीत दोषी ठरलेल्या संचालकांकडून वसुलीची रक्कमही निश्चित झाली. मात्र, तत्कालीन सहकारमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिल्याने संचालकांकडून वसुली झाली नाही. आता ही स्थगिती उठल्यानंतर थकीत कर्ज वसुली होणार आहे. बँकेच्या ६० कोटी थकीत कर्जापैकी अवसायन काळात ४९ कोटी कर्ज वसूल झाले. अद्याप १२ कोटी कर्जे व त्यावरील १८ कोटी व्याज वसूल होणे बाकी आहे. दि. २५ ऑगस्ट रोजी अवसायकाची मुदत संपल्याने बँकेची नोंदणी रद्दची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अंतिम सर्वसाधारण सभेची औपचारिकता अवसायक अनिल पैलवान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

नोंदणी रद्द न करता पतसंस्थेच्या स्वरूपात बँक सुरू ठेवावी. बड्या कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करावी. एकरकमी कर्जफेड योजना सुरू ठेवावी आदी सभासदांनी मांडलेले ठराव मंजूर करण्यात आले. बँकेत अडकलेल्या एक लाखावरील ठेवी परत देण्यात आल्या आहेत. मुख्य इमारत व मार्केट शाखेच्या इमारतींची सुमारे सहा कोटी रुपयांना विक्री झाली आहे. या रकमेतून एक लाखावरील ठेवीदारांना त्यांची रक्कम परत देण्यात आल्याचे बँकेचे अवसायक अनिल पैलवान यांनी सांगितले. अवसायकांची मुदत संपल्याने आता बँकेचे परिसमापक थकीत कर्जवसुली करणार आहेत.

Previous Post

Breaking : “या” माजी मंत्र्याच्या स्विय सहायकाविरोधात गुन्हा दाखल, राजकीय घडामोडींना वेग

Next Post

ब्रेकिंग | मंगळवार पेठेत तरुणाचा खून..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मंगळवार पेठेत तरुणाचा खून..!

ब्रेकिंग | मंगळवार पेठेत तरुणाचा खून..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group