• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | ठेकेदाराने ठेवला कामगारांवर विश्वास अन् पोलीस करत आहेत “त्या’ प्रकरणाचा तपास..!जतमध्ये १६ लाखाच्या साहित्यांची परस्पर विक्री..

Admin by Admin
November 19, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत : खबऱ्या प्रतिनिधी / जत येथे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे. म्हैसाळ कॅनॉलचे सिमेंट काँक्रीट अस्तरीकरणाचे काम एका ठेकेदाराने घेतले आहे. या ठेकेदाराने कामावर नेमलेल्या कामगारावर विश्वास ठेवून कामावरील साहित्य व मशिनरी त्याच्या ताब्यात दिली.

परंतु या कामगाराने १६ लाख २० हजार किमतीचे जेसीबी व काँक्रीट मिशनची परस्पर विक्री केली. ठेकेदाराचा विश्वासघात केल्याप्रकरणी किशोर तिरुपती नायडू मरीपी (रा. रवीवलसा, आंध्रप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे अस्तरीकरणाचे काम आहे. आंध्रप्रदेशातील रमेश गोटटीपाटी या ठेकेदाराने हे काम घेतले आहे. त्यांनी त्यांच्याकडे किशोर मरीपी यांच्याकडे काम करून घेण्याची जबाबदारी दिली होती. म्हैसाळ कॅनॉल काम संपल्यानंतर किशोर मरीपी याच्याकडे ठेकेदाराचे साहित्य होते. दरम्यानच्या कालावधीत जेसीबी, काँक्रीट मशीन ,पेविंग मशीन व अन्य साहित्य असे १६ लाख २० हजार किमतीचे साहित्य ठेकेदार रमेश गोटटीपाटी यांना न विचारता या कामगाराने परस्पर विकले. कामगाराने विश्वासघात केल्याचे निदर्शनास येताच बाबू गोटटीपाटी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग |राज्य मागासवर्ग आयोगाने मनोज जरांगे पाटलांना फटकारले.!

Next Post

खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक

खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group