• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

DCM Kartiki Mahapuja: कार्तिकी महापूजेवरून सकल मराठा समाजात फूट, उपमुख्यमंत्री पंढरपुरात जाणार का?

Admin by Admin
November 19, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
DCM Kartiki Mahapuja: कार्तिकी महापूजेवरून सकल मराठा समाजात फूट, उपमुख्यमंत्री पंढरपुरात जाणार का?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पंढरपुरात कार्तिकी यात्रेनिमित्त होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवरून पंढरपुरातील सकल मराठा समाजामध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यास आपला विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मात्र मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला आपला विरोध कायम असल्याची भूमिका घेतली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपुरात सकल मराठा समाजाच्या वतीने 8 सप्टेंबर पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला विरोध दर्शवला होता. कालपर्यंत सकल मराठा समाज आपल्या निर्णयावर ठाम असतानाच आज मात्र काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी शासकीय महापूजेला विरोध नसल्याची भूमिका मांडली आहे.त्यानंतर लगेचच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला आपला विरोध कायम असल्याची भूमिका मांडली आहे.

दोन परस्पर भूमिकांमुळे पंढरपुरातील सकल मराठा समाजामध्ये विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवरून दोन गट पडले आहेत. सकल मराठा समाजाचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला आमचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी उपमुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात येऊ नये, अन्यथा होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल असा थेट इशारा दिला आहे. सकल मराठा समाजामध्ये दोन गट पडल्याने उपमुख्यमंत्री कार्तिकी महापूजेला पंढरपुरात येणार का याकडे लक्ष लागले आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | शेतकऱ्याच्या पोरांना हातात बंदुका घ्यायला लावू नका, स्वाभिमानीचा इशारा;

Next Post

मदरशातील अल्पवयीन मुलांकडून महिलांवर दगडफेक.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मदरशातील अल्पवयीन मुलांकडून महिलांवर दगडफेक.!

मदरशातील अल्पवयीन मुलांकडून महिलांवर दगडफेक.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group