सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / भाऊबीज निमित्त तळेगाव दाभाडे एमआयडीसी मधील बंद पडलेल्या जनरल मोटर्सच्या कामगारांच्या पत्नींनी आज (बुधवार) कामगार मंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांचा प्रश्न तातडीने निकाली काढा, हीच आमची भाऊबीज भेट ठरेल अशी मागणी करणार असल्याचे गोपनीय खबऱ्याशी बाेलताना सांगितले.
यावेळी मंत्री #खाडे यांच्या सांगली येथील बंगल्यावर पाेलीसांचा माेठा बंदाेबस्त हाेता.


पुण्यातील जनरल मोटर्स या अमेरिकन कंपनीचा तळेगाव पुणे मधील प्रकल्प एका नामांकित कंपनीला विकला जात आहे. हा करार होत असताना जनरल मोटर्सच्या १००० कायमस्वरूपी कामगारांचा रोजगार नव्याने येणाऱ्या कंपनीत दिला जात नाही.
नवीन येणाऱ्या कंपनीमध्ये जनरल मोटर्सच्या सर्व कामगारांच्या सेवा शर्तीसहीत नोकऱ्या हस्तांतरित व्हाव्यात अशी कामगारांची प्रमुख मागणी आहे. शासनाकडून कामगारांच्या प्रश्नाचे गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने कामगारांनी कामगार मंत्र्याच्या घरासमोर आज धडक मारली. यावेळी कामगारांसमवेत त्यांच्या पत्नी देखील हाेत्या.

आम्हांला कुटुंब अथवा प्रपंच चालविताना फार माेठी आर्थिक अडचण भासत आहे. तरी आमच्या मागणीची पूर्तता करुन भाऊबीजेचे मंत्री महाेद्यांनी गिफ्ट द्यावे अशी भावना कामगरांच्या पत्नींनी गोपनीय खबऱ्याशी बाेलताना व्यक्त केली.

