• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणे काढा अन्यथा आंदोलन

तुरची उपसरपंचासह आठ सदस्यांचे निवेदन

Admin by Admin
November 8, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रशासनाच्या चालढकल योजनेमुळे लोकप्रतीनिधी आक्रमक

तासगांव:- तासगांव तालुक्यातील तुरची ग्रामपंचायत हद्दीमध्ये सिटी सर्व्हे मिळकतीत ग्रामपंचायतीचा मालकीच्या जागेत अतिक्रमण करण्यात आले असून ते अतिक्रमण शासकीय नियमाप्रमाणे प्रशासनाने काढून टाकावे अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून आंदोलनातमक पवित्रा घेऊ असे निवेदन उपसरपंच भाऊसो खरात यांचेसह आठ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकांना दिले आहे. प्रशासनास वारंवार तोंडी सांगून ही जबाबदारी ढकलून अतिक्रमण काढण्यास प्रशासन चालढकल करीत असल्याने येथील लोकप्रतिनिधी आता आक्रमक झाले आहेत.

तुरची ग्रामपंचायत हद्दीमध्ये शासकीय जागेत अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत सदस्यांनी मासिक मीटिंग मध्ये वारंवार आवाज उठवला तरी ग्रामसेवक जबाबदारी ढकलत आहेत असा आरोप सदस्यांनी करीत अतिक्रमविरोधी जबाबदारी निश्चित करणारे शासकीय परिपत्रक जोडत उपसरपंच भाऊसो खरात, सदस्य अंकुश पाटील ,सचिन चव्हाण, रोहिणी खबाले, सखुबाई पाटील, लता मोरे, सतीश पाटील ,परशुराम सातपुते यांनी अतिक्रमण काढण्यासाठी लेखी निवेदन ग्रामसेवक यांना दिले आहे. यावेळी खबऱ्या शी बोलताना सर्व सही करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की, येत्या आठ दिवसांत प्रशासनानं काही कार्यवाही केली नाही तर नंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून आंदोलनात्मक पवित्रा घेऊ.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | ६४ लाखांचा गंडा घालत गॅस वितरण कंपनीला लुटले..!

Next Post

Maharashtra Police : … म्हणून पोलिसांना बोनस मिळत नाही!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Maharashtra Police : … म्हणून पोलिसांना बोनस मिळत नाही!

Maharashtra Police : ... म्हणून पोलिसांना बोनस मिळत नाही!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group