Friday, June 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कमी दरात सोने देण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास 26 लाखांचा गंडा जत मधील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल; तिघांना अटक

Admin by Admin
November 6, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
0
Sangli Murder Crime News : डोक्यातील राग अन् जुना वाद ; चाकुचे वार करून “त्या’चे आयुष्य केले बरबाद..!

 

पोलीस व राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप; तपास एलसीबी कडे देण्याची मागणी; माजी आमदार विलासराव जगताप

जत : कस्टमचे सोने देतो असे सांगून आंध्र प्रदेशातील एका सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारागिरास २६ लाख ५० हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात अनिल सुतार, द-याप्पा हावीनाळ, मेहबूब जातगार, रमेश कोळी, अमोल कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांपैकी अनिल सुतार, रमेश कोळी, अमोल कुलकर्णी या तिघांना अटक करण्यात आले असून, दोघे फरारी आहेत. तिघांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचा पंढरपूर येथील असलेला गणेश विरन्ना कमसल हा कारागीर सध्या कन्नूर (आंध्र प्रदेश) येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय करतो. त्याचे जवळचे नातेवाईक जत शहरात राहतात. या नातेवाईकाच्या मित्राच्या ओळखीने गणेशचा जतमधील सोने विकणाऱ्या टोळीशी संपर्क झाला टोळीने कस्टमचे सोने कमी किमतीत देतो असे सांगून त्यास जतमध्ये बोलाविले. नातेवाइकाच्या मदतीने मोबाइलवरच व्यवहार ठरवला. गणेश २६ लाख ५० हजाराची रक्कम घेऊन दोन दिवसांपूर्वी जतमध्ये आला. या टोळीने गणेशला एमआयडीसीमधील एका कोल्ड स्टोरेजमध्ये बोलविले. गणेश रक्कम घेऊन आपल्या नातेवाइकांसह तिथे पोहोचला. त्याने सोने दाखविण्याची विनंती केली पण आम्हाला बऱ्याच जणांनी गंडवले असून आधी रक्कम दाखवा मग सोने देऊ असे या टोळीने त्यांना सांगितले. गणेश यांनी पैशाची बॅग दाखविल्यानंतर बिस्किटे वितळून तुम्हाला दोन दिवसांत सोने देतो, तोपर्यंत तुम्ही रक्कम घेऊन जावा, असे टोळीने सांगितले. तेवढ्यात या टोळीत सामील असलेल्या एकाने हातातील बॅगेला हिसडा मारून ती ताब्यात घेऊन पलायन केले. त्यानंतर टोळीनेही तेथून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गेल्या दोन दिवसांपासून गणेश नातेवाइकांच्या मदतीने आपली रक्कम परत मिळावी यासाठी धडपडत होता. अखेर त्याने पोलिस प्रमुखांकडे तक्रार केल्यानंतर जत पोलिसाना लक्ष द्यावे लागले. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.

या प्रकरणात पोलीस व राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप; विलासराव जगताप

माजी आमदार विलासराव जगताप यांनी या प्रकरणावरती गंभीर आरोप करत अनेक खुलासे केले आहेत. जगताप म्हणाले या प्रकरणांमध्ये पोलीस, काही राजकीय नेते व माजी नगरसेवकांचा हस्तक्षेप आहे. त्यामुळे हा तपास एलसीबी कडे देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच आरोपींची नावे वगळण्यासाठी राजकीय दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी स्वतः या प्रकरणांमध्ये लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

Previous Post

कुपवाडमधील नामांकित शिक्षण संस्थेकडून पत्रकारांचा अपमान.? किंमत फक्त २०० रुपये..?

Next Post

Sangli Gram Panchayat Election Result : सांगलीत दोन गटात जोरदार वादावादी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..

Sangli Gram Panchayat Election Result : सांगलीत दोन गटात जोरदार वादावादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014