कुपवाड भागातील एका नामांकित शिक्षण संस्थेकडून पत्रकारांचा अपमान झाल्याचा प्रकार घडलाय. बातम्यांची प्रसिध्दी देण्यासाठी पत्रकारांना बोलावण्यात आले. संस्थेतील क्रीडा विभागाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन होण्या अगोदरच क्रीडा विभागातील “किड्याने” मोठ्या दैनिकांच्या प्रतिनिधींकडून दिवाळीचे प्रेमापोटी दिलेले गिफ्टच हातातून काढून घेतले. या प्रकाराने दैनिकाचे प्रतिनिधी चांगलेच संतापले. तर काहींना गोड पदार्थाचे ‘स्वीट बॉक्स” दिले. स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे आनंदाने हुरळून गेले अन् एका नव्या नाण्याच्या मिंद्यात न राहणाऱ्यांनी मात्र खेळाडू बुवांच्या तोंडावर स्वीट बॉक्स फेकून आल्याच्या चर्चेने सर्वत्र खळबळ माजली.
पत्रकारांच्या बाबतीत असा अपमानास्पद प्रकार होणे ही सर्वच पत्रकारांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मुळात याची लाज काही स्वाभिमान गहाण ठेवलेल्या पत्रकारांना वाटायला पाहिजे. गटबाजीचा फायदा घेत राजकारणी, प्रशासकीय लोक आपल्यात “दरी” निर्माण करू पाहत आहेत याची जाण ठेवायलाच हवी. केवळ “चोळ्याची” भूमिका घेणाऱ्या काही प्रतिनिधींना बुवाने रात्रीचा कार्यक्रम गच्च केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे.
याबाबतीत चेअरमन , संचालक यांना मात्र अंधारात ठेवून बुवाने पत्रकारांचा अपमान केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दोनशे रुपयांचा स्वीट बॉक्स देवून पत्रकारांची किंमत करणाऱ्या बुवाला लाज वाटायला पाहिजे. नेहमी “कामात” असणारे खेळाडू बुवा, आम्ही तुम्हाला २०० रुपये देतो तुम्ही आमचे वर्षभर गुणगान गाणार का..? असा प्रश्न पत्रकार आता विचारत आहेत.