• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

BIG BREAKING : मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा; सरसकट आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम..!

Admin by Admin
October 31, 2023
in राजकीय, सामाजिक
1 min read
0
मोठी बातमी : जरांगे पाटील यांना अटक करा ! सभेला विरोध दर्शवत ‘या’ बड्या वकिलाने केली मागणी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना : प्रतिनिधी / मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. जवळपास २० मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली असून सरसकट आरक्षण द्यावं या मागणीवर जरांगे पाटील ठाम असल्याची माहिती मिळत आहेत.

मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यातच या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. बीड जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. अशातच राज्य शासनाकडून आरक्षणाच्या हालचाली वाढल्या आहेत. काल मराठा आरक्षण मंत्री उपसमितीची बैठकही पार पडली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

या दोघांमध्ये जवळपास २० मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेदरम्यान, जरांगे पाटील यांनी सरसकट आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम असल्याचं सांगितलं. सरकार आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध असून योग्य निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचंही समजतं. विशेष म्हणजे जरांगे पाटील यांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. आज दुपारी मंत्रीमंडळ बैठक होत असून त्यात आरक्षणाच्या विषयावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post

सोलापुरात मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला पिटाळून लावले; डोक्यावर नमाजी टोप्या आणि हातात टाळ धरून भजन

Next Post

सांगलीत तब्बल ४ कोटीचे सोने पोलिसांनी केले हस्तगत

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत तब्बल ४ कोटीचे सोने पोलिसांनी केले हस्तगत

सांगलीत तब्बल ४ कोटीचे सोने पोलिसांनी केले हस्तगत

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group