Monday, June 9, 2025
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सोलापुरात मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला पिटाळून लावले; डोक्यावर नमाजी टोप्या आणि हातात टाळ धरून भजन

Admin by Admin
October 31, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
सोलापुरात मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला पिटाळून लावले; डोक्यावर नमाजी टोप्या आणि हातात टाळ धरून भजन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावत असताना सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाले आहे. भाजपचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना शासकीय विश्रामगृहातून आणि नंतर जिल्हा परिषदेतून अक्षरशः पिटाळून लावण्यात आले.

भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव घालत खडे बौल सुनावण्यात आले.

दुसरीकडे उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे आमरण उपोषणास बसलेले सोमनाथ राऊत यांची प्रकृती बिघडली तरी त्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. या गावातील शंभरपेक्षा अधिक तरूणांनी सामूहिक मुंडन करून साखळी उपोषण सुरू केले आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या कोडी गावातील संतप्त मराठा आंदोलकांनी महामार्गावरील पेट्रोल पंपांवर इंधन कंपन्यांच्या फलकावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमांना काळे फासण्यात आले. मोदी यांच्या प्रतिमा उलट्या टांगून घोषणा देण्यात आल्या. रस्त्यावरील एसटी बसेस अडवून त्यावरिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रतिमांनाही काळे फासण्यात आले. उत्तर सोलापूरसह मंगळवेढा, बार्शी आदी भागातही असाच उद्रेक दिसून आला.

दरम्यान, जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाची व्याप्ती वाढत असतानाच सकाळी भाजपचे कोकण विभागातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिक्षकांच्या प्रश्नावर आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. तेव्हा प्रथम शासकीय विश्रामगृहातून त्यांना प्रचंड घोषणाबाजी करीत अक्षरशः हुसकावून लावण्यात आले. परंतु त्यानंतर हेच आमदार म्हात्रे पुन्हा जिल्हा परिषदेत येऊन बैठक घेत असल्याचे कळल्यानंतर मराठा आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी जिल्हा परिषदेकडे मोर्चा वळवून तीव्र संताप व्यक्त केला. भाजपचे हेमंत पिंगळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजन जाधव, काँग्रेसचे विनोद भोसले, गणेश डोंगरे, प्रा. गणेश देशमुख, रवी मोहिते, उध्दव ठाकरेचलित शिवसेनेचे अजय दासरी, प्रताप चव्हाण आदींनी आमदार म्हात्रे यांच्याशी बरीच हुज्जत घालून त्यांना परत पाठविले.

म्हात्रे यांचे म्हणणे ऐकून घेण्याची आंदोलकांची मानसिकता नव्हती. तत्पूर्वी, होटगी रस्त्यावर भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन सकल मराठा समाजाने घेराव घातला. माऊली पवार, हेमंत पिंगळे व इतरांनी इमदार देशमुख यांना खडे बोल सुनावत तातडीने मुंबईत जाऊन सरकारला मराठा आरक्षण देण्यास भाग पाडावे, उपोषण करणारे जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीचे बरेवाईट झाल्यास त्याची शासनाला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा आंदोलकांनी दिला. मराठा आरक्षणासठी जिल्ह्यात पाचशेपेक्षा जास्त गावांमध्ये आंदोलन पेटले असताना त्यात मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी इतर बहुजन समाजासह मुस्लीम समाजही पुढे सरसावत आला आहे. सोलापुरात सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी वारकरी सांप्रदाय संघटनेने भजन आंदोलन केले. त्यावेळी माजी महापौर आरीफ शेख, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे मतीन बागवान व इतर कार्यकर्ते डोक्यावर पारंपारिक नमाजी टोप्या परिधान करून गळ्यात टाळ घेऊन भजनात तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

यापुढे शहरात “डॉल्बी” वाजवणार नसल्याचा प्रेरणादायी निर्णय..! सर्व स्तरातून कौतुक तर काही धिंगणाबाज नेते नाराज.?

Next Post

BIG BREAKING : मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा; सरसकट आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी : जरांगे पाटील यांना अटक करा ! सभेला विरोध दर्शवत ‘या’ बड्या वकिलाने केली मागणी

BIG BREAKING : मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा; सरसकट आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम..!

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

ताज्या बातम्या

सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

ब्रेकिंग | सांगली पोलीस दलातील ‘या’ चार पोलिसांची खातेनिहाय चौकशी होणार .!

by Admin
June 9, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली पोलिस दलामध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना...

ब्रेकिंग ! मुंबईत दोन फास्ट लोकलचा अपघात, सहा जणांचा मृत्यू

ब्रेकिंग ! मुंबईत दोन फास्ट लोकलचा अपघात, सहा जणांचा मृत्यू

by Admin
June 9, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मुंबई लोकलमध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे. फास्ट लोकलमधून प्रवास...

चौक सोडून घोळक्याने कारवाई; वाहतूक शाखेतील तीन पोलीस निलंबित

चौक सोडून घोळक्याने कारवाई; वाहतूक शाखेतील तीन पोलीस निलंबित

by Admin
June 9, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या वाहतूक नियमनासाठी नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्या चौकात कारवाई करणाऱ्या...

मोठी बातमी | मिरजेतील तणाव तब्बल चार तासांनी निवळला, पोलिसांची यशस्वी भूमिका, तातडीने निर्णय..!

मोठी बातमी | मिरजेतील तणाव तब्बल चार तासांनी निवळला, पोलिसांची यशस्वी भूमिका, तातडीने निर्णय..!

by Admin
June 9, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरात असणार्‍या एका प्रार्थनास्थळाच्या संरक्षक भिंतीवर नाचल्याच्या कारणातून मिरजेत रविवारी दोन गटात तणाव...

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

by Admin
June 5, 2025
0

अगदी क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, खुनाच्या घटना राज्यात ठिकठिकाणी रोज घडत असल्याचे समोर येत आहे. यातच सांगली शहरामध्ये एका भाजी विक्रेत्या...

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने लगट वाढवून अनैतिक संबंधाचा आरोप करण्याची भीती घालत महिलेसह पाच जणांच्या...

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या इस्लामपूर बसस्थानक परिसरात पिस्तूल घेऊन फिरणार्‍या जिलानी मकबुल नरगुंद (वय 27, रा. चांद कॉलनी, मिरज)...

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या काँग्रेसच्या बंडखोर नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत मदनभाऊ गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group