• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींचे उपोषण..!

Admin by Admin
October 30, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींचे उपोषण..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षणाचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी सोमवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

रविवारी सांगलीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीवेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित आमदार, खासदार यांना मराठा आरक्षणाबाबत धारेवर धरले. यावेळी सर्वच लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षण प्रश्‍नी राजीनामे द्यावेत, विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा आग्रह शासनाकडे धरावा आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. आक्रमक कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून लोकप्रतिनिधींनी आज मराठा आरक्षणासाठी एक दिवसांचे उपोषण करण्याचे जाहीर केले होते.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपोषण केले. यामध्ये खा.संजयकाका पाटील, आमदार डॉ.विश्‍वजित कदम अनिल बाबर, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, विक्रमसिंह सावंत, अरूण लाड, माजी आमदार सदाशिवराव पाटील, नितीन शिंदे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Previous Post

विटा येथे मराठा कार्यकर्त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे तणाव..!

Next Post

मोठी बातमी | ग्रामस्थांची जागरूकता ; शासकीय मुरूम चोरून नेताना ट्रॅक्टर पकडले, मुरूम चोरट्यांना इशारा : उदगाव येथील प्रकार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | ग्रामस्थांची जागरूकता ; शासकीय मुरूम चोरून नेताना ट्रॅक्टर पकडले, मुरूम चोरट्यांना इशारा : उदगाव येथील प्रकार

मोठी बातमी | ग्रामस्थांची जागरूकता ; शासकीय मुरूम चोरून नेताना ट्रॅक्टर पकडले, मुरूम चोरट्यांना इशारा : उदगाव येथील प्रकार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group