• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महासभा गाजणार, तू भारी का.? मी भारी… खडाजंगी जनतेच्या दरबारी..! महापालिकेची महासभा ,वादंगाचा प्रश्न उभा..!

Admin by Admin
April 9, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
महासभा गाजणार, तू भारी का.? मी भारी… खडाजंगी जनतेच्या दरबारी..! महापालिकेची महासभा ,वादंगाचा प्रश्न उभा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी/ महानगरपालिकेची महासभा दि. 18 एप्रिलरोजी होणार आहे. दि. 18 फेब्रूवारीच्या महासभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याचा पहिलाच विषय या महासभेपुढे आहे.

त्यावरून काँग्रेस व भाजप नगरसेवकांकडून महासभेत वादंग होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, 18 फेब्रुवारीच्या वादग्रस्त महासभेबाबत तातडीने सुनावणी घ्यावी, यासाठी काँग्रेस व भाजपतर्फे उच्च न्यायालयात सोमवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.

महानगरपालिकेची महासभा दि. 18 रोजी सकाळी 11.30 वाजता पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात प्रत्यक्ष उपस्थितीने होणार आहे. मागील सर्वसाधारण सभा दि. 18 फेब्रुवारीरोजी झाली होती. या सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे हा विषय महासभेच्या अजेंड्यावरील पहिला विषय आहे.

काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या महापालिकेच्या ऑनलाईन महासभेवर बहिष्कार घातला होता. मात्र काँग्रेस व भाजपच्या काही सदस्यांनी ऑनलाईन सभेत सहभाग घेतला होता. कोरम नसताना महासभा घेतल्याने ती रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे व भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त व नगरविकासचे प्रधान सचिव यांच्याकडे केलेली आहे. त्यावर संबंधितांकडून काही निर्देश नाहीत.

उपमहापौर उमेश पाटील (काँग्रेस), नगरसेवक संतोष पाटील, भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनी दि. 18 फेब्रुवारीची महासभा रद्द करावी या महासभेत मंजूर केलेले विषय रद्द करावेत, या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. त्यावर दि. 20 एप्रिलरोजी सुनावणी होणार आहे. दि. 18 एप्रिलरोजीच महासभा होणार आहे. त्यामुळे महासभेपूर्वी सुनावणी घ्यावी, या मागणीसाठी सोमवारी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहोत, अशी माहिती संतोष पाटील यांनी दिली.

महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा

मिरज येथील पंढरपूर रोडवरील स.नं.969 / 1 ब जागेत श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारुढ ब्राँझ धातू पुतळा बसविण्यास मान्यतेचा विषय दि. 18 एप्रिलच्या महासभेपुढे आहे.

Previous Post

सीईओ साहेब , माझ्या मृत्यूच्या कार्यक्रमासाठी तरी माझे हक्काचे पैसे मिळतील का ?

Next Post

गुणरत्न सदावर्तेंना अटक..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गुणरत्न सदावर्तेंना अटक..

गुणरत्न सदावर्तेंना अटक..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group