• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सीईओ साहेब , माझ्या मृत्यूच्या कार्यक्रमासाठी तरी माझे हक्काचे पैसे मिळतील का ?

तावशीच्या अपंग काकाची आर्त हाक , स्वामी साहेब ऐकतील काय ?

Admin by Admin
April 9, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
सीईओ साहेब , माझ्या मृत्यूच्या कार्यक्रमासाठी तरी माझे हक्काचे पैसे मिळतील का ?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील शरीराने अपंग असलेल्या तावशीच्या काका सूर्यवंशी यांनी 16 वर्षे तावशी ग्रामपंचायत मध्ये लिपिक म्हणून काम करीत असताना आज पर्यंत त्यांना कोणत्याही ग्रामसेवकाने त्रास न देता अपंग आहे म्हणून संभाळून घेतले. काकाने पण लिपिक पदाची सेवा प्रामाणिकपणे बजावली .आणि गावातील नागरिकांची कोणतीही तक्रार येऊ दिली नाही. गावातील नागरिकांना सोबत घेऊन कामे केली .परंतु मागील सहा वर्षापूर्वी तावशी ग्रामपंचायतीला नवीन ग्रामसेविका जे एस पाटील यांनी मी शरीराने अपंग आहे माहित असून सुद्धा मला वारंवार त्रास देऊन, दप्तर इकडे आणा तिकडे न्या म्हणत नको ते कामे सांगून, माझी पिळवणूक केली आहे. या ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराला मी कंटाळून शेवटी ग्रामपंचायत कार्यालयात जाणे बंद करुन घरी बसलो. एवढा त्रास मला या ग्रामसेविकेने दिला होता. ग्रामसेविका पाटील यांनी रहाणीमान भत्ता न दिल्यामुळे काकासमोर आता त्यांच्या कुंटूबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. म्हणूनच त्यांनी माझ्या मृत्यूच्या कार्यावेळी तरी माझ्या हक्काचे पैसे मिळतील का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
तावशीचे काकासो अंबादास सूर्यवंशी अपंग असून तावशी ग्रामपंचायत मध्ये लिपिक म्हणून काम करत होते परंतु पाटील ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराला आणि माझ्यासारखी मीच शहाणे म्हणून वावरणाऱ्या ग्रामसेवकाच्या कारभाराला कंटाळून मी कामावर जाणे बंद केले .मी लिपीक पदाचे काम बंद करून पण पाच वर्षे झाली. तरीसुद्धा मला ग्रामपंचायतीकडून राहणीमान भत्ता नव्वद हजार रुपये अद्याप मिळालेला नाही . मला पाटील ग्रामसेविकेने 2019 ला तुमचा रहाणीमान भत्ता ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे तावशी ग्रामपंचायत देऊ शकत नाही, तरी ग्रामपंचायतीकडे निधी आल्यास आपला रहाणीमान भत्ता टप्या टप्पाने दर तीन महिन्याला पाच हजार रुपये प्रमाणे अदा करण्यात येईल असे पत्र तावशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका ज्योती पाटील यांनी त्यांच्या सहीने ग्रामपंचायतीच्या लेटर पॅड लिहून दिले होते तरी सुध्दा मला रहाणीमान भत्ता दिलेला नाही. स्व :ताला सावित्रीच्या लेकी समजणाऱ्या ग्रामसेविका ज्योती पाटील खोटं बोलून कागदोपत्री सुध्दा काकांची दिशाभूल केली आहे. हीच का सावित्रीच्या लेकीची शिकवण.

 

काकांनी राहणीमान भत्त्यासाठी मागील वर्षी तावशी ग्रामपंचायत समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. परंतु गावातील काही सुज्ञ नागरिकांनी आणि पंचायत समितीच्या विस्ताराधिकारी यांनी तुमचे पैसे लवकरात लवकर देऊ म्हणून आत्मदहन काही करू नका असे सांगितल्यानंतर मी आत्मदहन न करण्याचा निर्णय घेतला .परंतु या गोष्टीला आज एक वर्ष पूर्ण झाले तरीसुद्धा तावशी ग्रामपंचायतीने व ग्रामसेविकेने माझा राहणीमान भत्ता देऊ केलं नाही .वारंवार मागणी केली असता ग्रामपंचायतचा वसूल नाही म्हणून ग्रामसेविका ज्योती पाटील टाळाटाळ करीत आहेत .जवळपास 50 ते 60 लाखांचा वसुलीचा डिमांड असतानादेखील ग्रामसेविका वसुली करत नाही . रहाणीमान भत्ता न मिळाले याबाबत काका सूर्यवंशी यांनी पंचायत समिती पंढरपूर गटविकास अधिकारी काळे यांना लेखी पत्रव्यवहार करून सुद्धा माझा राहणीमान भत्ताचा विषय तसाच प्रलंबित ठेवला आहे. काही महिन्यापूर्वीच पंढरपूरचे गटविकास अधिकारी मनमानी कारभार करीत असल्याबद्दल त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कर्तव्यमुक्त केले होते. मग तावशीच्या ग्रामसेविका ज्योती पाटील मनमानी पद्धतीचा कारभार करत आहेत. त्यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी कारवाई करणार का ? हा खरा प्रश्न आहे.

Previous Post

सांगली | काँग्रेसचा हातावर हात, शिवसेना सुस्त ,भाजप नेत्यांना वेळ मिळेना..! राष्ट्रवादी आक्रमक..!

Next Post

महासभा गाजणार, तू भारी का.? मी भारी… खडाजंगी जनतेच्या दरबारी..! महापालिकेची महासभा ,वादंगाचा प्रश्न उभा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महासभा गाजणार, तू भारी का.? मी भारी… खडाजंगी जनतेच्या दरबारी..! महापालिकेची महासभा ,वादंगाचा प्रश्न उभा..!

महासभा गाजणार, तू भारी का.? मी भारी... खडाजंगी जनतेच्या दरबारी..! महापालिकेची महासभा ,वादंगाचा प्रश्न उभा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group