• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गांजा लागवड व विक्रीप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

Admin by Admin
October 30, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
गांजा लागवड व विक्रीप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत..

नागठाणे : कुसवडे (ता. सातारा) येथे गांजा लागवड केल्याप्रकरणी अशोक पांडुरंग पवार (रा. कुसवडे) याच्यावर तर नागठाणे (ता. सातारा) येथे गांजा विक्री करणाऱ्या अमोल अण्णा मोहिते (रा.नागठाणे) याच्यावर बोरगाव पोलिसांनी कारवाई केली असून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 6 किलो 350 ग्रॅम वजनाचा एक लाख 56 हजार 500 रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

अधिक माहिती अशी की, कुसवडे येथे गांजाची लागवड केली असल्याची माहिती बोरगाव पोलिसांच्या डीबी पथकाला मिळाली होती. त्यानंतर बोरगाव पोलिस ठाण्यातील डीबी पथकाने कुसवडे येथे छापा टाकला असता अशोक पांडुरंग पवारने त्याच्या घराजवळ गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी अशोक पवार याच्यावर कारवाई करुन 5 किलो 130 ग्रॅम वजनाचा 1 लाख 28 हजार 500 रुपयांच्या गांजासदृश्‍य वनस्पतीची झाडे जप्त केली. पवार याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, नागठाणे गावातील दुसऱ्या कारवाईमध्ये अमोल आण्णा मोहिते उर्फ गोंज्या त्याच्या घराजवळ गांजाची विक्री करत असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या डीबी पथकाने त्याठिकाणी छापा टाकून अमोल मोहिते याच्याकडून 1 किलो 120 ग्रॅम वजन व एकूण 28 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा डाळींबकर व उपनिरीक्षक राजाराम निकम करत आहेत. या कारवाईत राजाराम निकम, दादा स्वामी, सुनील कर्णे, पोलीस नाईक दीपक मांडवे, प्रशांत चव्हाण व नम्रता जाधव, कॉन्स्टेबल संजय जाधव, दादा माने, पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील व सातारा येथील फॉरेन्सिक युनिटमधील हवालदार मोहन नाचण, रुद्रायण राऊत, अमोल निकम व नार्कोटिक डॉग युनिट पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनावडे, डॉग हॅन्डलर दत्तात्रय चव्हाण व अंमली पदार्थ शोधक श्‍वान सूचक सहभागी झाले होते.

Previous Post

‘त्या’ पोलिस हवालदारांची बदली न केल्यास उपोषण..

Next Post

मराठा आरक्षणासाठी विधिमंडळ अधिवेशन बोलवा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मराठा आरक्षणासाठी विधिमंडळ अधिवेशन बोलवा

मराठा आरक्षणासाठी विधिमंडळ अधिवेशन बोलवा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group