• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगली जिल्ह्यातील “या” गावात राजकीय नेत्यांना बंदी..!

Admin by Admin
October 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | सांगली जिल्ह्यातील “या” गावात राजकीय नेत्यांना बंदी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गोपनीय खबऱ्या ऑनलाईन प्रतिनिधी : हिंगणगादे (ता.खानापूर) येथील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत खासदार, आमदार, नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती यांच्यासह सर्व राजकीय पक्षाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना गावबंदी करणारे हिंगणगादे गाव सांगली जिल्ह्यात पहिले ठरले आहे. आज दुपारी झालेल्या सभेमध्ये मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर हिंगणगादे येथील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्व नेते आणि सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले. यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला. शिवाय गावाच्या मुख्य रस्त्यावर “एकच मिशन मराठा आरक्षण”, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी असेल. जो कोणी येईल, त्याचा मराठा आरक्षणाला विरोध आहे असे समजून त्याच्यावर राजकीय बहिष्कार घालण्यात येईल, असे ठळक अक्षरात फलक लावलेले आहेत.

यावेळी शंकर नाना मोहिते, सरपंच अजितकुमार मोहिते, विकास सोसायटीचे अध्यक्ष जालिंदर मोहिते, परशुराम साळुंखे, विष्णू यादव, महादेव कदम, निलेश निकम, काकासो मोहिते, राहुल सूर्यवंशी, रमेश मोहिते, रमेश सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

Big Breaking – Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा; सरकारला घाम फुटणार..?

Next Post

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी टोकाचं पाऊस, 38 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी टोकाचं पाऊस, 38 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं..

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी टोकाचं पाऊस, 38 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group