• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बेवड्याला वाचवण्याच्या नादात पोलिसांची बोलेरो पलटी..? तीन पोलीस कर्मचारी जखमी : अपघातस्थळी दारूच्या बाटल्या..!

Admin by Admin
October 10, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
बेवड्याला वाचवण्याच्या नादात पोलिसांची बोलेरो पलटी..? तीन पोलीस कर्मचारी जखमी : अपघातस्थळी दारूच्या बाटल्या..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी : तालुक्यातील बेडग रस्त्यावर दुचाकी आडवी आल्याने पोलिसांची निर्भया पथकाची गाडी पलटी झाली. या अपघातात तीन पोलीस किरकोळ जखमी झाले.दुचाकीस्वार या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात बोलेरो पलटी

आडव्या आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात मिरज पोलिसाची बोलेरो पलटी झाली. बेडग गावातील शाळांची तपासणी करून निर्भया पथक मिरजेकडे परत येत असताना हा अपघात झाला. दुचाकीस्वार आडवा आल्याने या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात पोलिस वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि पलटी झाले. बेडग ते आडवा रस्ता दरम्यान हा अपघात झाला. बोलेरो वाहनातील तीन पोलीस किरकोळ जखमी झाले.

मद्यप्राशन करून दुचाकीस्वार वाहन चालवत असल्याने अपघाताचा संशय

निर्भया पथकातील एएसआय संभाजी धेंडे, अजित कोळेकर, इरवंत येमलवाड अशी जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत. महादेव रायप्पा निवलगी (रा. मदभावी, कर्नाटक) असे दुचाकीस्वार वाहनचालकाचे नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. मिरज शासकीय रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघात ठिकाणी दुचाकीजवळ दारूच्या बाटल्या आढळल्या. मद्यप्राशन करून दुचाकीस्वार वाहन चालवत असल्याने अपघाताचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

ब्रेकिंग | “तुझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करेन. तुझ्या बापाला सांग त्यालाही गाडीवरून उचलून आणेन..” एकतर्फी प्रेमातून नकार मिळाल्याने सोहेलची तरुणीला धमकी..!

Next Post

क्राईम | महिलांबद्दल मनात यायची आंबट भावना अन् आतून खुलायचा आठवले..! अश्लिल स्टेटस ठेवल्याच्या रागातून खून करीत त्याला यमसदनी पाठवले.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
क्राईम | महिलांबद्दल मनात यायची आंबट भावना अन् आतून खुलायचा आठवले..! अश्लिल स्टेटस ठेवल्याच्या रागातून खून करीत त्याला यमसदनी पाठवले.?

क्राईम | महिलांबद्दल मनात यायची आंबट भावना अन् आतून खुलायचा आठवले..! अश्लिल स्टेटस ठेवल्याच्या रागातून खून करीत त्याला यमसदनी पाठवले.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group