• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत परप्रांतीयांची दहशत.? : डोक्यात गॅस स्टोव्ह घालून तरूणाचा निर्घृण खून..आर्थिक वादातून गेम केल्याची माहिती.?

Admin by Admin
October 8, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत परप्रांतीयांची दहशत.? : डोक्यात गॅस स्टोव्ह घालून तरूणाचा निर्घृण खून..आर्थिक वादातून गेम केल्याची माहिती.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

संजयनगर येथील झेंडा चौकात नितीन आनंदराव शिंदे (वय ३२) या तरूणाच्या डोक्यात गॅस स्टोव्ह घालून निर्घृण खून करणअयात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडला. किरकोळ वादातूनही हा खून चौघांनी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री उशीरापर्यंत पंचनामा सुरू होता. दरम्यान, जिल्ह्यात एका मागून एक खून होत असल्याने पोलिस चक्रावले आहे.

याबाबात घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की नितीन शिंदे संजयनगर येथील खेराडकर पेट्रोलपंपाजवळील झेंडा चौकात राहण्यास आहे. त्याची मालवाहतूक गाडी असून तो व्यवसाय करतो. नितीनच्या वडिलांची वखार आहे.

नितीन कामवरून परतल्यानंतर आज सांयकाळी घराबाहेर पडला होता. त्यावेळी त्याची एका परप्रांतीयाच्या घराजवळ तो आला होता. त्या चौकात संशयित आले. त्याच्या किरकोळ कारणातून वादावादी झाली.

त्यानंतर अर्धा तासाने नितीन हा घरात गेला. त्यावेळी संशयित पुन्हा दुचाकीवरून आले. त्यानंतर पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी तेथील गॅस स्टोव्ह उचलून नितीनच्या डोक्यात घातला. एकच वर्मी घाव बसल्याने नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

अतिरक्तस्त्राव झाल्याने नितीनचा जागीच मृत्यू झाला. हा खून किरकोळ कारणातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अद्याप ठोस कारण समजू शकले नाही. खूनाची माहिती समजताच पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरिक्षक सुरज बिजली, विनोद साळुंखे, संतोष पुजारी, कपिल साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्री. जाधव यांनी तपासाच्या सूचना दिल्या. घटनास्थळी पंचनामा करून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिलमध्ये पाठवला.

Previous Post

सांगलीत “त्या” ५२ खुळ्यांनी पत्रकारांचा धसकाच घेतला.! “तुम्ही धाब्यावर न्या.. आम्ही धाब्यावर बसवतो..”

Next Post

ब्रेकिंग | “तुझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करेन. तुझ्या बापाला सांग त्यालाही गाडीवरून उचलून आणेन..” एकतर्फी प्रेमातून नकार मिळाल्याने सोहेलची तरुणीला धमकी..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

ब्रेकिंग | "तुझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करेन. तुझ्या बापाला सांग त्यालाही गाडीवरून उचलून आणेन.." एकतर्फी प्रेमातून नकार मिळाल्याने सोहेलची तरुणीला धमकी..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group