• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत पोलिस अंमलदाराची आत्महत्या..! कारण अस्पष्ट, शहर पोलिसांत नोंद

Admin by Admin
September 25, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
0
सांगलीत पोलिस अंमलदाराची आत्महत्या..! कारण अस्पष्ट, शहर पोलिसांत नोंद
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली शहर पोलिस ठाण्याकडील अंमलदार वसीम मुसा अत्तार (वय ४२, रा. मुजावर प्लॉट, बसस्थानक परिसर, सांगली) यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसीम अत्तार हे मिरजेतील महात्मा गांधी पोलिस चौकीत कार्यरत होते. चार महिन्यापुर्वी त्यांची सांगली शहर पोलिस ठाण्यात बदली झाली होती. रविवारी ते ड्युटीवरून घरी परतले होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर तातडीने शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तरूण पोलिस अंमलदाराने आत्महत्या केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Previous Post

मास्तरांच्या सभेत प्रचंड गदारोळ ; गुरुजींनी अंडी फेकली..!

Next Post

बस स्थानकावर प्रवासी महिलेच्या दागिन्यावर डल्ला; ७० हजाराचा मुद्देमाल लंपास

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात

बस स्थानकावर प्रवासी महिलेच्या दागिन्यावर डल्ला; ७० हजाराचा मुद्देमाल लंपास

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group