कुपवाड शहरातील पीर हजरत लाडले मशायक दर्ग्याच्या भव्य पटांगणात शनिवारी सायंकाळी शाहे हुसैन यांच्या स्मरणार्थ महंमद हुसेन करबल मेल, कुपवाड यांच्या सहकार्याने करबल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा करबल मेल पूर्वीपासून कुपवाड मध्ये गैबीमलंक ढालाईत, अल्लाबक्ष गैबी ढालाईत, शब्बीर आप्पालाल पिरजादे,आशमुद्दीन गैबी ढालाईत, यांचे वारसदार, नजीर ढालाईत, नूर मंहम्मद ढालाईत, लियाकत शब्बीर पिरजादे,लायक रमजान पिरजादे, रशीद दस्तगीर ढालाईत, जुबेर रमजान पिरजादे यांनी ही करबल मेलची कुपवाडमध्ये परंपरा आज पर्यंत अविरत चालू ठेवली आहे.
मोहरम निमित्त हा खेळ ग्रामीण भागात अनेक वर्षापासून खेळला जातो. धार्मिक आणि राष्ट्रीय एकात्मता जपणारी गाणी म्हणत तरुण मंडळी एक ताल आणि सुरत करबल खेळून लक्ष वेधून घेतात. हा खेळ जरी ग्रामीण भागात खेळला जात असला तरी, कुपवाड सारख्या शहरी भागात करबल मेलचा खेळ करणारी पथके तयार झाली आहेत.
या करबल मेळाव्यात एकूण आठ करबल मेल संघांनी सहभाग घेतला.अनेक वर्षांची परंपरा असलेला व लोप पावत चाललेल्या करबल या पारंपरिक लोककलेचा कलाआविष्कार पाहण्यासाठी परिसरातील हिंदू मुस्लिम भाविकांनी गर्दी केली होती.
महंमद हुसैन करबल मेल यांच्या वतीने अध्यक्ष अमिर पिरजादे यांच्यासह पदाधिकाऱ्यानी केलेल्या नेटक्या संयोजनातून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
हा मेळावा २६ ऑगस्ट शनिवारी सायंकाळी सहा वाजता सुरु झाला . मोहम्मद हुसेन करबल मेल (कुपवाड), शाहे हुसेन करबल मेल ताज उस्ताद (रोजा बागणी), मुजावर करबल मेल (चांद उस्ताद कुपवाड), यादे हुसेन करबल मेल (कादरी उस्ताद कुपवाड), सात सय्यद करबल मेल (कादरी वस्ताद कवठेपिरान), बाबू जमाल करबल मेल (चांद उस्ताद कुंभोज ), हजरत शेर अली बाबा करबल मेल (चांद उस्ताद रेंदाळ ), चांद उस्ताद करबल मेल (कनवाड), या करबल मेल च्या कलाकारांनी हिंदी मराठी रिवायती सादर करत कलेच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
सामाजिक एकतेचा संदेश, इमाम हुसेन यांचे महात्म्य, त्यांच्या शौर्याच्या आठवणी या रीवयातीतून सादर करण्यात आल्या. घुमके, ताशा, टाळच्या तालावर ध्वजधारक कलाकारांनी कलेचे उत्कृष्ठ सादरीकरण केले . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, पृथ्वीराज पाटील, गजानन मगदूम, शेठजी मोहिते, मुश्ताक रंगरेज, पैलवान बाळासाहेब मंगसुळे, आयनुदीन मुजावर, झाकीर मुजावर, राजू पैलवान यांच्यासह सामजिक, राजकिय क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या उपस्थित हा करबलचा खेळ कुपवाड मध्ये पार पडला.

