• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग : माजी नगरसेवकाचे सासरे; आमदाराचे व्याही… चोरट्यांनी यांनाही सोडले नाही..!

Admin by Admin
August 30, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
सांगली ब्रेकिंग : माजी नगरसेवकाचे सासरे; आमदाराचे व्याही… चोरट्यांनी यांनाही सोडले नाही..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली जिल्ह्यात घरफोडी व चोरीचे प्रमाण वाढले आहे. विट्यात आमदार अनिलराव बाबर यांच्या व्याह्याच्या घरात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिन्यासह तीन लाख रुपयांवर डल्ला मारला. विशेष म्हणजे घरातील लोक झोपली असताना बेडरुमच्या खिडकीचे ग्रील तोडून ही घरफोडी झाली.

ही घटना आज (दि.२८) मध्यरात्री येथील सिद्धिविनायक कॉलनी येथे घडली. या प्रकरणी पोपटराव जाधव यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साळशिंगे रोडवरील सिद्धिविनायक कॉलनीमध्ये पोपटराव जाधव यांचे घर आहे. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते आपल्या पत्नीसोबत या घरामध्ये राहतात. आज मंगळवारी (दि.२९) सकाळी उठल्यानंतर जाधव यांना आपल्या घरी चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यांनी याबाबतची फिर्याद विटा पोलिसात दिली.

पोपटराव जाधव हे आमदार अनिलराव बाबर यांचे व्याही आणि माजी नगरसेवक अमोल बाबर यांचे सासरे आहेत. या घरफोडीत ६० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या २० ग्रॅम वजनाच्या लहान १० अंगठ्या, ६० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या २० ग्रॅम वजनाच्या २ वेडन अंगठ्या आणि १ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे ३ लाख ५ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरिक्षक संतोष डोके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यासह घटनास्थळी श्वानपथक मागवण्यात आले. तसेच चोरी झालेल्या ठिकाणी फिंगर प्रिंटसही घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके करीत आहेत.

Previous Post

पोरांनो, कामाला लागा, आरोग्य विभागात तब्बल ११ हजार जागांची भरती!

Next Post

इंडिया आघाडीच्या बैठकीतील मोठी बातमी गोपनीय खबऱ्याच्या हाती, “हा” मोठा निर्णय घेण्यात आला?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
इंडिया आघाडीच्या बैठकीतील मोठी बातमी गोपनीय खबऱ्याच्या हाती, “हा” मोठा निर्णय घेण्यात आला?

इंडिया आघाडीच्या बैठकीतील मोठी बातमी गोपनीय खबऱ्याच्या हाती, "हा" मोठा निर्णय घेण्यात आला?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group