• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इंडिया आघाडीच्या बैठकीतील मोठी बातमी गोपनीय खबऱ्याच्या हाती, “हा” मोठा निर्णय घेण्यात आला?

Admin by Admin
August 31, 2023
in राजकीय, शोध पत्रकारिता
1 min read
0
इंडिया आघाडीच्या बैठकीतील मोठी बातमी गोपनीय खबऱ्याच्या हाती, “हा” मोठा निर्णय घेण्यात आला?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इंडिया आघाडीची आज आणि उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडत आहे. याच बैठकीतील एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीतली आतली बातमी ‘खबऱ्या“च्या हाती लागली आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटपच्या फॉर्म्युल्याबाबत या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. खात्रीलायक सूत्रांनी याबाबत आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याविषयी माहिती दिली आहे.

सूत्रांनी याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप पूर्ण करणार, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ग्रँड हयात हॉटेलमध्ये सध्या अनौपचारिक बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर डिनर डिप्लोमसी होणार आहे. त्यानंतर उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

राज्यनिहाय कमिटी स्थापन होणार..

जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी राज्यनिहाय कमिट्या स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक राज्याच्या समितीनुसार, त्या त्या राज्यात जागावाटप होणार आहे. एकास एक उमेदवार देण्याची रणनीती आहे. सगळ्या पक्षांचा मिळून एक उमेदवार विरुद्ध भाजप आणि एनडीए आघाडीचा उमेदवार अशी लढत झाली तर इंडिया आघाडीचा उमेदवार जिंकण्याची शक्यता जास्त राहील, असा यामागील विचार आहे. त्यामुळे जागावाटप 30 सप्टेंपर्यंत पूर्ण करणं आणि ते जाहीर करणं तसेच प्रचारासाठी योग्य नीती ठरवणं हा सध्या बैठकीतला मुद्दा आहे.

मुदतपूर्व लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता..?

देशात मुदतपूर्व लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर या पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात एक देश एक निवडणूक हे विधेयक मांडलं जाण्याची चर्चा आहे. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर देशात सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यात येण्याच्या शक्यता आहे. या निवडणुका डिसेंबर महिन्यात घेतल्या जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विरोधी पक्ष देखील तयारीला लागले आहेत. मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात. त्याआधीच जागावाटप जाहीर करुन उमेदवार करुन प्रचाराला सुरुवात करणं ही इंडिया आघाडीची रणनीती दिसत आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग : माजी नगरसेवकाचे सासरे; आमदाराचे व्याही… चोरट्यांनी यांनाही सोडले नाही..!

Next Post

अखेर “त्या” प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..

अखेर "त्या" प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group