• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Dombivali Crime : तोतया टीसी बनवून करायचा लूट : एक चूक नडली अन् पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!

Admin by Admin
August 26, 2023
in क्राईम
1 min read
0
Dombivali Crime : तोतया टीसी बनवून करायचा लूट : एक चूक नडली अन् पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

हल्ली फसवणूक करण्यासाठी आरोपी काय करतील याचा नेम नाही. अशीच एक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. एक 21 वर्षीय तरुण टीसी बनून प्रवाशांकडून पैसे वसूल करत होता. मात्र एक चूक नडली अन् पोलिसांच्या तावडीत सापडला.

इंटरनेटवर पाहून टीसीचे हुबेहूब ओळखपत्र बनवले. मग रेल्वेत रुबाबात टीसी बनून फिरणाऱ्या तोतयाला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय बहादूर सिंह असे तोतया टीसीचे नाव आहे. लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात दंड वसुली करत होता. मात्र त्याची एक चूक नडली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. आरोपीने आतापर्यंत दंडाच्या नावाखाली किती पैसे वसूल केले?, केव्हापासून तो हे सर्व करत होता? याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

दिवा, कोपर, डोंबिवली स्थानकांच्या दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अवैधरित्या दंड वसुली सुरु होती. आरोपी दंडाच्या ठरल्या रकमेपेक्षा अधिक दंड प्रवाशांकडून वसूक करत होता. प्रवाशांकडून स्थानक प्रबंधक कार्यालयात टीसी दिलेल्या दंडापेक्षा अधिक दंड वसूल करत असल्याची तक्रार दाखल झाली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी दिवा स्थानकात पालत ठेवून टीसी बनून फिरणाऱ्या विजय सिंह या तरुणाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केली असता वियजयने आपल्याकडील ओळखपत्र दाखवले. यानंतर पोलिसांनी मुंबईतील मुख्य तिकीट निरीक्षक प्रमोद सरगईया यांच्याकडे विजय सिंह नावाच्या टीसीबाबत चौकशी केली. मात्र सरगईया यांनी अशा नावाचा कुणी टीसी नसल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच त्याच्याकडे असलेले ओळखपत्रही बनावट असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बोगस टीसीने आतापर्यंत किती प्रवाशांची लूट केली? त्याने अशा पद्धतीने आणखी कुठे गुन्हे केले आहेत का? ओळखपत्र त्याने कुठून बनवून घेतले? या संदर्भात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी आणि तपास सुरू आहे.

Previous Post

मोठ्या दिलाचा माणूस असलेला संदेश बापू आपल्याला सोडून गेला.

Next Post

पुणे शहरात कोट्यवधींचे ड्रग्स लपवून आणले कसे, ‘डीआरआय’च्या नजरेत आले अन् तस्करांच्या मुसक्या बांधल्या

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पुणे शहरात कोट्यवधींचे ड्रग्स लपवून आणले कसे, ‘डीआरआय’च्या नजरेत आले अन् तस्करांच्या मुसक्या बांधल्या

पुणे शहरात कोट्यवधींचे ड्रग्स लपवून आणले कसे, ‘डीआरआय’च्या नजरेत आले अन् तस्करांच्या मुसक्या बांधल्या

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group