• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आबा कुटुंब शेवटपर्यंत शरद पवार साहेबांसोबतच : रोहित आर. आर. पाटील

Admin by Admin
August 6, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
आबा कुटुंब शेवटपर्यंत शरद पवार साहेबांसोबतच : रोहित आर. आर. पाटील
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तासगाव : (प्रतिनिधी) आमदार सुमन पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सोबत पुणे येथील एका हॉटेलमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याची बातमी एक अफवा आहे. आम्हाला सुध्दा प्रसारमाध्यमातून हे कळलेले आहे. आबा कुटूंबाची भूमिका अजित दादा पवार यांनी बंड केले त्यावेळी स्पष्ट केली आहे. आम्ही शेवटपर्यंत शरद पवार यांचेसोबतच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवा नेते, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य रोहित आर. आर. पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

गेल्या कांही दिवसापासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मानसिंग नाईक, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे अजित पवार गटात सहभागी जातील अशा वावड्या उठल्या आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार सुमन पाटील यांनी हॉटेलमध्ये त्यांची भेट घेतली असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून येत आहेत. याबाबत प्रतिक्रिया विचारले असता रोहित पाटील बोलत होते.

रोहित पाटील म्हणाले, आर. आर. आबा यांच्या पाठिशी कोणतीही राजकीय ताकद नसताना मोठ्या पदावरती काम करण्याची संधी दिली. आबांचे राजकारण पवार साहेब यांचा पाठिंबा, निष्कलंक चारित्र्य व या मतदारसंघातील लोकांचे प्रेम आणि पाठिंबा या गोष्टींच्या जिवावर मोठे झाले होते. आमचीही राजकारणातील वाटचाल तत्वे आणि निष्ठा या पायावरतीच टिकून आहे. आबा कुटूंबाची भूमिका अजित पवार यांनी जेंव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेंव्हाच स्पष्ट केलेली आहे. पवार साहेबांना साथ देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे, ही भूमिका कराड येथेच जाहीर केली आहे. आजही आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत.

Previous Post

जत तालुक्याचे त्रिभाजन करा : आमदार गोपीचंद पडळकर

Next Post

कमरेला पिस्तूल, गुंडासोबत पोलिस उपनिरीक्षकाचा डान्स : आ.राणे म्हणाले, बदनामी…..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कमरेला पिस्तूल, गुंडासोबत पोलिस उपनिरीक्षकाचा डान्स : आ.राणे म्हणाले, बदनामी…..!

कमरेला पिस्तूल, गुंडासोबत पोलिस उपनिरीक्षकाचा डान्स : आ.राणे म्हणाले, बदनामी.....!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group