• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सिमकार्ड घेताय ..! तेही बोगस कागदपत्राच्या आधारे..थांबा, पोलिसांनी चौघांवर केला गुन्हा दाखल : जिल्हा पोलिसांची करडी नजर.

Admin by Admin
August 5, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत प्रतिनिधी / खबऱ्या ऑनलाईन: राज्यात बोगस सिमकार्डची पडताळणी चालू आहे. राज्यात १ हजार ६६४ बोगस सिम कार्ड असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील तब्बल ५१० बोगस सिमकार्ड जत तालुक्यातील असल्याचे पडताळणीतून समोर आले आहे. याबाबत दूरसंचार विभागाने तशी माहिती पोलीस विभागाकडे दिली आहे. यावरून पोलिसांनी संबंधित कार्डविक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

जत तालुक्यातील सिमकार्ड विक्रीधारकांनी ४ पिओसी कोडवरून जाणीवपूर्वक हेतूने बोगस कागदपत्राच्या आधारे एका कंपनीचे सिम कार्ड वितरित करणाऱ्या दोघांवर जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

यात उमराणी येथील ३ पीओशी कोडधारकाने ३८८ इतके सिमकार्ड बोगस कागदपत्राच्या आधारे विक्री केले आहे. तर शहरातील मंगळवार पेठेतील तेली गल्ली येथील पीओशी कोडधारकाने तब्बल १२२ बोगस सिम कार्ड वितरित केल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित विभागाने जत पोलिसाकडे सदरचा गुन्हा वर्ग केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीशैल वळसंग यांनी जत पोलिसात दिली आहे.

शहरातील मंगळवार पेठ येथे एक मोबाईल दुकान विक्रेता सिमकार्ड विक्री करत होता. यात एका कोडवर तब्बल १२२ कार्डधारकांचे बोगस कागदपत्रे सादर केली असल्याचे दिसून आले आहेत. यामध्ये संबंधित विभागाची कार्ड विक्रेतेने स्वतःच्या फायद्याकरीता फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. तर तसेच उमराणी येथील एका कार्ड विक्रेत्यांनी ३ पोओसी कोड वरून तब्बल ३८८ कार्ड वेगवेगळ्या नावाने विक्री केल्याचे दिसून आले आहे. यामुळे तालुक्यात बोगस कार्डांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस याबाबत सतर्क झाले असून कसून चौकशी करत आहेत. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

बोगस कागदपत्राच्या आधारे सिम कार्ड विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. बनावट व बोगस कागदपत्र दाखल करून फसवणूक केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. भविष्यात असे कृत्य करणाऱ्या वर तात्काळ गुन्हे दाखल होतील. याबाबत सायबर क्राईम अधिक सतर्क आहे.
– पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे

Previous Post

विटा पोलिसांनी केले एकाच तपासात पाच गुन्हे उघडकीस

Next Post

धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, एक जण ताब्यात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, एक जण ताब्यात

धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, एक जण ताब्यात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group