• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पुण्यात सरकारी अधिकाऱ्यांचे रॅकेट उघड, ४४ जण निलंबित

Admin by Admin
April 6, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पुण्यात सरकारी अधिकाऱ्यांचे रॅकेट उघड, ४४ जण निलंबित
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे– शहरात अनधिकृत इमारतींमधील सदनिका तसेच बेकायदा प्लॉटिंगची दस्त नोंदणी केल्याप्रकरणी शासनाने नोंदणी व मुद्रांक विभागातील 44 अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करून घरचा रस्ता दाखविला आहे.

यामध्ये 11 दुय्यम निबंधकांचा समावेश आहे. नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची इतिहासातील पहिलीच वेळ आहे. यामुळे नोंदणी व मुद्रांक विभागातील बेबंदशाहीला लगाम बसणार असल्याची भावना व्यक्‍त होत आहे. शहरात रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी झाल्याबाबत तक्रारी राज्य शासनाकडे करण्यात आल्या होत्या.

त्यानुसार शहरातील 27 दुय्यम निबंधक कार्यालयांमधील मागील तीन वर्षांत नोंदविलेल्या सुमारे एक लाख दस्तांची तपासणी सुरु करण्यात आली होती. तपासणी पथक हे राज्य शासनाने नेमले होते. या तपासणीमध्ये काही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नियमबाह्यपणे दस्तांची नोंदणी झाल्याचे दिसून आले आहे. रेरा कायद्याचे उल्लंघन करून तब्बल 10 हजार 561 दस्तनोंदणी केल्याचे आढळून आले आहे. हा तपासणी अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर शासनाने दोषी आढळणाऱ्या 44 अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नोंदणी व मुद्रांक विभागाला दिले. त्यानुसार नोंदणी महानिरीक्षक यांनी ही कारवाई केली आहे.

राज्य शासनाने अनधिकृत बांधकामांची दस्त नोंदणी करू नये, असे आदेश दिले आहेत. तसेच संबधित बांधकाम प्रकल्पाची नोंदणी रेरा प्राधिकरणाकडे करुन रेरा क्रमांक दस्तामध्ये नोंदणी करणे आवश्‍यक आहे. अशा स्पष्ट सूचना असतानाही दुय्यम निबंधकांनी बेजाबदारपणे रेरा क्रमांक नसलेल्या बांधकाम प्रकल्पांमधील दस्तांची नोंदणी केली. जमिनीचे तुकडे पाडून त्याची विक्री करण्यास मनाई असतानासुद्धा एक-एक गुंठ्यांची दस्तनोंदणी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दुय्यम निबंधकांचे हे कारनामे खुद्द महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर निलंबनाची कारवाई करणाचे आदेश दिले.

अशी झाली तपासणी
दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदविण्यात आलेल्या दस्तांची या पथकाने बारकाईने पाहणी केली. यामध्ये बांधकाम प्रकल्पातील सदनिका अथवा दुकाने यांची नोंदणी करतेवेळी दस्तामध्ये ‘रेरा’ क्रमांक नमुद आहे का? बांधकाम प्रकल्पाला मंजुरी आहे का, याचसह जमिनीचे तुकडे करून विक्री केली आहे का, याची तपासणी केली. यामध्ये नियमबाह्यपणे दस्तनोंदणी केल्याचे आढळून आले.

11 अधिकाऱ्यांचा समावेश

400 पेक्षा जास्त दस्त बेकायदेशीरपणे नोंदविल्या प्रकरणी 11 अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली आहे. तर 100 ते 350 पर्यंत दस्त नोंदविणाऱ्या 9 अधिकाऱ्यांची बदली करून चौकशी करण्यात येत आहे. 11 ते 99 पर्यंत दस्त नोंदविणाऱ्या 9 जणांची विभागीय चौकशी, तर 2 ते 10 दस्त नोंदविणाऱ्यांकडून खुलासा मागवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

निबंधक-लिपिकांची साखळी
शहरातील हवेली क्रमांक 27 मध्ये कार्यरत असणाऱ्या एका दुय्यम निबंधकाने तब्बल 1 हजार 286 दस्त बेकायदेशीरपणे नोंदविले आहे. दुय्यम निबंधकाचा तात्पुरता पदभार असणाऱ्या वरिष्ठ लिपिकाने आपल्या साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत 810 दस्त नोंदविले. तर दुसऱ्या वरिष्ठ लिपिकाने 804 दस्त बेकायदेशीरपणे नोंदविले. दुय्यम निबंधकांचे हे कारनामे सुरू असताना वरिष्ठ लिपीक आणि कनिष्ठ लिपिकाने सुद्धा रेरा कायद्याचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर दस्त नोंदविल्याचे तपासणीत आढळले आहे. या कनिष्ठ लिपिकाने तब्बल 652 दस्त नोंदविले आहेत. 20 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी 100 ते बाराशे पर्यंत नियमांचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केली आहे.

Previous Post

सांगलीत राष्ट्रवादी-भाजप पदाधिकार्‍यांमध्ये ‘तु तु- मै मै’..! 

Next Post

काँग्रेस आमदारांच्या तक्रारी ऐकून सोनिया म्हणाल्या, “हे तर मला माहिती आहे”…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
काँग्रेस आमदारांच्या तक्रारी ऐकून सोनिया म्हणाल्या, “हे तर मला माहिती आहे”…

काँग्रेस आमदारांच्या तक्रारी ऐकून सोनिया म्हणाल्या, "हे तर मला माहिती आहे"...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group