• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जयसिंगपूरच्या महिलेची पुण्यात काढली किडनी..!

Admin by Admin
April 6, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जयसिंगपूरच्या महिलेची पुण्यात काढली किडनी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जयसिंगपूर येथील येथील एका महिलेला एजंटांनी पुण्यात आणले, पैशांचे आमिष दाखवून तिची किडनी काढली आणि ती अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपितही केली… पुण्यातील एका रुग्णालयातील हा धक्‍कादायक प्रकार घडला आहे.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर एजंटसोबतचा आर्थिक व्यवहार फिसकटल्याने संबंधित महिलेने त्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आणि त्यानंतर हा तस्करीचा प्रकार उजेडात आला. दरम्यान, रुग्णालयानेही या प्रकरणाबाबत पोलिसांत धाव घेत महिलेविरोधात तक्रार दिली आहे.

सारिका गंगाधर सुतार ही महिला जयसिंगपूर येथे राहते. तेथे ती हॉटेलमध्ये चपात्या लाटून आपल्या दिव्यांग मुलासह दोन मुलांना सांभाळते. पतीने काही वर्षांपूर्वीच तिची साथ सोडली आहे. तिच्या डोक्यावर कर्ज असल्याने व मुलांच्या भविष्याच्या चिंतेने ती सतत तणावात असायची. याच दरम्यान वर्षभरापूर्वी तिला एक महिला भेटली तिने तिची पैशांची गरज ओळखून रवीभाऊ नावाच्या एंजंटाची ओळख करून दिली.

या एजंटने तिच्यासमोर पैशांच्या बदल्यात तिची किडनी पुण्यातील साळुंके नावाच्या व्यक्‍तीला विकण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यातून तिला 15 लाख रुपये मिळतील, असे आश्‍वासन दिले; तसेच ‘एका किडनीवरही तू जिवंत राहू शकतेस’ असे सांगितले. 15 लाख रुपये मिळणार म्हणून सारिकानेही किडनी देण्यास होकार दर्शविला. त्यानंतर वर्षभरापासून संबंधित महिला पुण्यात येत होती. तिच्या रक्‍ताचा गटही किडनी आवश्यक असलेल्या साळुंके नावाच्या व्यक्‍तीसोबत जुळला. किडनीचा हा तोंडी व्यवहार एजंटमार्फत झाला होता.

Previous Post

वाळव्याचा वाघ डरकाळी फोडणार की शिराळ्याचा नाग फुत्कारणार ..? दोन्ही शेजारी एकत्र आले, पुढं काय..? येणारी वेळच ‘घड्याळासाठी ‘ महत्वाची असेल..?

Next Post

जयंतरावांनी शेखर इनामदार यांची काळजी करू नये ..! भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांचा टोला.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयंतरावांनी शेखर इनामदार यांची काळजी करू नये ..! भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांचा टोला.

जयंतरावांनी शेखर इनामदार यांची काळजी करू नये ..! भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांचा टोला.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group