• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाड पोलिसांकडून दैनंदिन पेट्रोलिंग ; गुन्हेगारांच्यात भिती तर नागरिकांत समाधान..!

Admin by Admin
July 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
कुपवाड पोलिसांकडून दैनंदिन पेट्रोलिंग ; गुन्हेगारांच्यात भिती तर नागरिकांत समाधान..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड – प्रवीण मिरजकर / कुपवाड परिसर संवेदनशील आहे. कुपवाड परिसरात कारखानदारी व विविध प्रकारच्या कंपन्या असल्याने स्थानिक मजुरांबरोबरच परप्रांतीय मजूरही मोठ्या प्रमाणात आहेत. नेहमीच कुपवाड परिसरातील गुन्हेगारी चर्चेत असते. परंतु आता मात्र कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सगळीकडेच शांतता पहावयास मिळत आहे. याचे कारण कुपवाड पोलिसांनी गुन्हेगारीवर ठेवलेलं नियंत्रण. पोलिसांची गुन्हेगारांवर असलेली करडी नजर, तर दुसरीकडे जनसामान्यांच्या सोबत असलेला संवाद. यामुळेच तळागाळापर्यंत पोहोचलेला कुपवाड पोलीस ठाण्याचा कर्मचारी व अधिकारी वर्ग सर्वसामान्यांसाठी आधार बनलाय. यामुळे पोलिसांच्या बाबतीत कुपवाडकर नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

भर पावसात, तर कधी रात्रीच्या एक-दोन वाजताही चौकात, गल्लीत व शहरापासून काही अंतरावर उनाड माळावरती असलेल्या परिसरात पोलीस पेट्रोलिंग करताना दिसतोय.

कुपवाड शहरात गुन्हेगारांच्यावर वचक ठेवण्यासाठी स्वतः कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील व त्यांची टीम दैनंदिन कुपवाड शहरातील बाजार मार्केट मधून रूट मार्शल काढताहेत. कुपवाड शहरातील फाळकुट दादा, टवाळकी नशेखोर, गांजाडी आदी नशा करण्याच्यांवर कुपवाड पोलिसांची करडी नजर आहे. शहरातील मुख्य चौकात, प्रामुख्याने स्वामी मळा, कुपवाड पाण्याची टाकी चौक, आर. पी. पाटील हायस्कूल, आंबा चौक या ठिकाणी नशा करून चौका चौकात दंगा करणारे टवाळखोर, फाळकुट दादा यांच्यात पोलिसांबद्दल भीती असल्याचे वातावरण आहे.

गुन्हेगारांच्यावरती धाक असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या, भुरटे चोर, दरोडेखोर, मोठ्या व्याज दराने पैसे फिरवणारे सावकार, पेट्रोल डिझेल चोर, महिला व मुलींची छेडछाड करणारे रोडरोमियो यांच्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून अशा प्रवृत्तींना पळवून पळवून, मेरी आवाज सुनो म्हणत काठीचा प्रसाद दिला जातोय. याप्रकारे कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याची टीम जोरदार मोहीम राबवत आहे.

Previous Post

रविकांत तुपकरांनी काढली पालकमंत्र्यांची खरडपट्टी!

Next Post

सांगली | राजकारण्यांनाही गंडा : वर्षात दुप्पट रक्कमेच्या अमिषाने ५५ लाखांना गंडा : तिघांवर गुन्हा : प्रारंभी गुंतवणूकदारांना १५ लाखांचा परतावा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बनावट कागदपत्राच्या आधारे घर हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

सांगली | राजकारण्यांनाही गंडा : वर्षात दुप्पट रक्कमेच्या अमिषाने ५५ लाखांना गंडा : तिघांवर गुन्हा : प्रारंभी गुंतवणूकदारांना १५ लाखांचा परतावा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group