• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अवैध वाळू वाहतूक करणारं डम्पर सोडवण्यासाठी तलाठयाची तहसीलदारांबरोबर हुज्जत?

तलाठयाच्या देखरेखीखाली सुरु होती अवैध वाळू तस्करी..?

Admin by Admin
July 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
अवैध वाळू वाहतूक करणारं डम्पर सोडवण्यासाठी तलाठयाची तहसीलदारांबरोबर हुज्जत?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गाडी विनाकारवाई सोडवण्यासाठी हालचाली गतिमान….

पलूस:- अवैध वाळू वाहतूक करीत असताना पकडलेलं डम्पर सोडवण्यासाठी महिला तलाठयाने चक्क पलूस तहसीलदारांशी हुज्जत घातल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून यापेक्षाही भयंकर ऐकायचं म्हणजे सदर महिला तलाठयाच्या देखरेखी खाली सदर वाळू तस्करी सुरु असल्याचे स्पष्ट झालं आहे. तर सदर पकडलेलं वाहन विना कारवाई सोडवण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या सदर वाहन विना कारवाई सुटल्यास मोठा बवाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पलूस तहसीलदार यांनी शुक्रवारी मध्यरात्री म्हणजे शनिवारी पहाटेच्या सुमारास एक अवैध वाळू तस्करी करणारे वाहन (डम्पर) पकडले होते. संबंधित वाहणाच्या पाठीमागूनच खानापूर तालुक्यातील एक महिला तलाठी चार चाकी वाहनातून येत होती. वाहन थांबवलेलं पाहून संबंधित महिला तलाठयाने आपल्या चार चाकी गाडीतून बाहेर येऊन पाहिलं असतं असता संबंधित अवैध वाळूचे वाहन पकडलं असल्याचे लक्षात आलं. यावर “तुम्ही कशी काय गाडी अडवली, तुमचा काय संबंध, ही गाडी माझी आहे मी तलाठी आहे, माझ्या घराच्या कामासाठी ही वाळू मी घेऊन चालली आहे “. असं धडाधड बतावणी सुरु केली. बहुधा संबंधित तलाठयास गाडी अडवणारी व्यक्ति पलूस चे तहसीलदार आहेत हे माहित नसावं आणि माहित असलं तरी कायद्याचं कमी ज्ञान असल्याने तिचा तोरा म्हणे पाहण्यासारखा होता. अवैध वाळू वाहतूक हा कायद्याने गुन्हा आहे आणि हा गुन्हा कोणीही केला तरी त्याच्यावर कारवाई ही होणारच या हेतूने पलूस तहसीलदार यांनी सदर वाहन तहसील कार्यालयात घेण्याचे आदेश दिले.

सदर वाहन ताब्यात घेत असताना संबंधित तलाठयाने भरपूर विरोध केल्याचं एकण्यात आलं तसेच सदर वाहन विना कारवाई सोडवण्यासाठी हालचाली गतिमान झाल्याचे खबऱ्यास ऐकायला मिळत आहे.

तलाठयाच्या देखरेखी खाली अवैध वाळू तस्करी? तहसीलदार कारवाईचा प्रस्ताव पाठवणार का?

पलूस तहसीलदारांनी शुक्रवारी मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक करणारे डम्पर पकडल्या नंतर एका महिला तलाठयाने तहसीलदारांशी हुज्जत घातल्याचे खात्रीलायक वृत्त आहे आणि यास प्रशासनातील काही लोकांनी दुजोरा ही दिला आहे.सदर वाहन हे संबंधित तलाठयाच्या देखरेखी खाली अवैध वाळू तस्करी करीत असल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध झालं आहे शिवाय संबंधित तलाठयाने आपल्या कर्तव्याला तिलांजली दिल्याचं स्पष्ट झालं आहे यावरून पलूस तहसीलदार याबाबत आपला अनुभव व संबंधित तलाठयाचे गैरवर्तन व कर्तव्यात कसूर बाबत आपल्या वरिष्ठाना कळवणार का? तसेच संबंधित तलाठयावर शिस्त भंगाची कारवाई होणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

पलूस तालुक्यात रात्रीस खेळ जोरात चाले..

पलूस तालुक्यातून अवैध वाळू तस्करी सध्या जोमात सुरु असून लागेबांधे असणाऱ्या लोकांना कारवाई तून अभय दिलं जात असल्याची चर्चा सध्या दबक्या आवाज पलूस सह पंचक्रोशी मध्ये सुरु आहे. अवैध वाळू सह मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम तस्करी सुद्धा रात्रीची सुरु असते असं स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्र झाली कि मुरूम आणि वाळू यांची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरु असते. प्रशासन मात्र एखादी जुजबी कारवाई करून स्वतः कर्तव्य दक्ष असल्याचा दाखवत आहे परंतु ” ये पब्लिक है ये सब जानती है… “

Previous Post

मोठी बातमी | टोलनाका फोडला ; अमित ठाकरे यांना टोलनाक्यावर अडवून ठेवले; मनसे सैनिकांनी केले खळखट्ट्याक..!

Next Post

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, अनेकांची…!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, अनेकांची…!

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, अनेकांची...!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group