गोपनीय खबऱ्या / एक एप्रिलला घडलेला प्रकार, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या दालनात विना परवानगी प्रवेश करणाऱ्या वकिलास अजित पवार यांच्या अंगरक्षकाने रोखले असता त्यास धक्काबुक्की केल्या प्रकरणी वकिलावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती असी की, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार एक एप्रिल रोजी त्यांच्या दालनात असताना त्यांना भेटण्यासाठी वकिली क्षेत्रातील एका व्यक्तीने प्रयत्न केला परंतु मिटिंगचे कारण दाखवून अजित पवार यांच्या अंगरक्षकाने त्यांना दालनामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी त्या अंगरक्षका सोबत हुज्जत घालत त्यास धक्काबुक्की केल्याच्या तक्रारीवरून 2 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान संबधित वकिल हे माहिती अधिकार कार्यकर्ते असून एका प्रकरणात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची तक्रार ग्रामविकास विभागाकडे केली असून ग्रामविकास विभागाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याचे कळते.

