• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | टोमॅटोने केले लखपती.! तीस गुंठ्यांत चक्क दहा लाख..!

Admin by Admin
July 19, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष, सामाजिक
1 min read
0
मिरज | टोमॅटोने केले लखपती.! तीस गुंठ्यांत चक्क दहा लाख..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज तालुक्यातील टाकळीतील प्रीतम पाटील व बोलवाड येथील दीपक पाटील या प्रगतशील शेतकऱ्यांनी ३० गुंठ्यांमध्ये १५ टन टोमॅटो उत्पादनातून दहा लाखाचे उत्पन्न घेतले. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत हिकमतीने पिकवलेल्या टाेमॅटाेला विक्रमी भाव मिळाल्यामुळे यंदाचा हंगाम साधला आहे.

गतवर्षी एका टनाचे मिळाले केवळ ११ रुपये!

गतवर्षी प्रीतम व दीपक यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले होते. मोठा तोटा सहन करावा लागला. गतवर्षी डिसेंबरमध्ये व्यापाऱ्याला दिलेल्या एक टन टोमॅटोची पट्टी केवळ ११ रुपये मिळाली होती!

द्राक्षबागांसह पालेभाज्यांची शेती अनियमित वातावरणामुळे तोट्यात आहे. अनेक वेळेस पिकांच्या उत्पादनाचे खर्चही निघत नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होताे. ज्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, तोच उपाशी राहतो. मात्र, यंदा टोमॅटोने शेतकऱ्यांना तारले आहे. टाकळी येथील प्रीतम पाटील व बोलवाड येथील दीपक पाटील हे दोन तरुण शेतकरी गेल्या पाच वर्षापासून टोमॅटोचे उत्पादन घेतात. अनेकदा तोटाही सहन करावा लागला. मात्र, त्यांनी हार मानली नाही.

तीस गुंठ्यात अथर्व जातीच्या टोमॅटोच्या रोपांची मार्चमध्ये लागण केली. त्याची पहिली तोडणी ९० दिवसांनंतर सुरू झाली. २० रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत दर मिळाला. दोन महिन्यापासून सुमारे १५ टन टोमॅटो कोल्हापूर, वडगाव, बेळगाव, आंध्र प्रदेशातील बाजारात गेले. पुढील काही दिवसात आणखी पाच टन टोमॅटो होतील. यातून दहा लाखाचे उत्पन्न मिळणार आहे.

Previous Post

खासदार संजय पाटील यांच्या कंपनीला बेकायदेशीर कर्जपुरवठा ; एका संस्थेचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या कंपनीस कर्ज..!

Next Post

महानगरपालिकेतील “त्या” गैरव्यवहाराची चौकशी होणार ; अधिवेशनात गाजला सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा मुद्दा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!

महानगरपालिकेतील "त्या" गैरव्यवहाराची चौकशी होणार ; अधिवेशनात गाजला सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा मुद्दा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group