• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खासदार संजय पाटील यांच्या कंपनीला बेकायदेशीर कर्जपुरवठा ; एका संस्थेचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या कंपनीस कर्ज..!

Admin by Admin
July 19, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने खासदार संजय पाटील यांच्या डिवाईन फुडस् कंपनीला २७ कोटी २९ लाख रुपयांच्या तारण मालमत्तेवर ४१ कोटी १२ लाख रुपयांचे कर्ज दिले. याशिवाय या कंपनीला दिलेल्या कर्जातील १५ कोटी रुपये यशवंत कारखान्याच्या खरेदीसाठी वापरण्यात आल्याची बाब चौकशी अधिकाऱ्यांनी उजेडात आणली आहे.

बँकेच्या अजब व्यवहारांबाबत अहवालात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. डिवाईन फुडसची मालमत्ता २७ कोटीची असताना त्यांना जादा कर्जवाटप केले. पुन्हा ५२ कोटीच्या कर्ज थकबाकीपोटी याच कंपनीची मालमत्ता ३६ कोटी १९ लाखास खरेदी केली. त्यामुळे कंपनीकडे अद्याप १५ कोटी ८५ लाख येणे आहे. कंपनीची मालमत्ता खरेदी केली गेल्याने शिल्लक येणेबाकी विनातारणी झाल्याने कर्ज बुडीतचा धोका निर्माण झाला आहे.
डिवाईन कंपनीस मंजुर कर्जापैकी १५ कोटी रुपये यशवंत शुगरच्या करंट खात्यास जमा केली. हीच रक्कम नंतर यशवंत कारखान्याच्या खरेदीसाठी अनामत जमा करण्यात आल्याचे चौकशी अधिकाऱ्यांना दिसून आले, यावर गंभीर ताशेरे ओढले आहेत.

खासदारांची मालमत्ता तारणमुक्त
खासदार संजय पाटील हे डिवाईन फुडस कंपनीचे संचालक होते. त्यांनी चानक २७ एप्रिल २०१५ रोजी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. नियमानुसार कंपनीचे कर्ज पूर्ण फिटेपर्यंत कोणत्याही संचालकाला निवृत्त होता येत नाही. या अटीचे उल्लंघन करीत खासदारांची मालमत्ता तारणमुक्त करण्यात आल्याचा ठपका अधिकाऱ्यांनी ठेवला आहे.

११ कोटी ५० लाखाला विक्री
सूतगिरणीच्या विक्रीत शासनाची फसवणूक बाबासाहेब सूतगिरणीच्या कर्ज थकबाकीपोटी व एनपीए कमी करण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट मत अहवालात नमूद केले आहे. सूतगिरणीची मालमत्ता ४० कोटी ३९ लाखाची असताना ती सूतगिरणी केवळ ११ कोटी ५० लाखाला विकली. त्यामुळे इतर देणी देता आली नाहीत.

संचित तोटा, तरीही कर्जवाटप
खानापूर तालुका सहकारी सूतगिरणीस संचित तोटा असतानाही जिल्हा बँकेने त्यांना २० कोटी ९२ लाख कर्ज मंजूर केले. मशिनरी खरेदीसाठी पुन्हा ५२ कोटीच्या कर्ज थकबाकीपोटी धनादेश कोणाला दिले, याचाही तपशील नसल्याने नियमांचे उल्लंघन झाल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

Previous Post

भाजपचा प्रस्थापितांना धक्का! अनेक जिल्हाध्यक्ष बदलले; नवीन चेहरेही पुढे आणले

Next Post

मिरज | टोमॅटोने केले लखपती.! तीस गुंठ्यांत चक्क दहा लाख..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज | टोमॅटोने केले लखपती.! तीस गुंठ्यांत चक्क दहा लाख..!

मिरज | टोमॅटोने केले लखपती.! तीस गुंठ्यांत चक्क दहा लाख..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group