• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : जिल्हा परिषदेत फाईल ट्रॅकिंग यंत्रणा..?

Admin by Admin
March 23, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली : जिल्हा परिषदेत फाईल ट्रॅकिंग यंत्रणा..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली / खबऱ्या प्रतिनिधी :- जिल्हा परिषदेत ई-फाईल ट्रॅकिंग टपाल मॉनिटरिंग सिस्टिम (एमटीएमएस) ही यंत्रणा तयार केली आहे. दि. 1 एप्रिलपासून ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आणि सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली.

डुडी म्हणाले, जिल्हा परिषदेत येणार्‍या प्रत्येक माणसाचे काम वेळेत व योग्य पद्धतीने व्हावे. आलेल्या अर्जाची बिनचूक नोंद होऊन वेळेत कार्यवाही होण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राहुल गावडे यांनी एफटीएमएस यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

अर्जदाराने जिल्हा परिषदेत कोणत्याही विभागात सादर केलेल्या अर्जाची एफटीएमएस या सिस्टीममध्ये नोंद होणार आहे. पहिल्या टप्प्यात हा अर्ज स्वीकारल्यानंंतर टपाल आवक विभागातील संबंधित प्रक्रिया पूर्ण करून संबधित विभागाकडे अर्ज पाठवतील. त्यानंतर संबधित अर्जदारास मोबाईल मेसेज जाईल.

त्या मेसेजमध्ये एक लिंक शेअर केलेली असेल. संबंधित अर्जदाराने त्या लिंकवर क्लिक केल्यास सिस्टिम ओपन होईल. अर्जदाराचा अर्ज कुठे आहे, कोणत्या टेबलवर किती दिवस अर्ज व फाईल आहे ते समजणार आहे. त्यांच्याशी संपर्क साधू शकणार
आहेत.

त्यामुळे कामाला गती मिळणार आहे. कर्मचार्‍यांनाही प्रत्येक महिन्याच्या कामाची माहिती सादर करण्याच्या कामातील त्रास कमी होणार आहे. फाईल ई-ट्रॅकिंग यंत्रणेमुळे लोकांची कामे गतीने होतील, तसेच हेलपाटे कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

Previous Post

गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

Next Post

🅾️High alert in Delhi : दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
🅾️High alert in Delhi : दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

🅾️High alert in Delhi : दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group