• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली| टोल नाक्यातील शेडवर एसटी आदळली; 25 प्रवाशी जखमी

Admin by Admin
July 18, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
सांगली| टोल नाक्यातील शेडवर एसटी आदळली; 25 प्रवाशी जखमी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगलीवाडीत बंद अवस्थेतील टोल नाक्यातील शेडमध्ये भरधाव बस जाऊन आदळल्याने 25 प्रवाशी जखमी झाले. सोमवारी दुपारी हा अपघात झाला. बसच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

नाईकबा ते सांगली ही बस (एम.एच.40, एन. 9503) ने सोमवारी दुपारी सांगलीकडे येत होती. चालक तुकाराम बाबासाहेब कुलकर्णी (वय 43, रा. भडकंबे, ता. वाळवा) या बसवर चालक होते. सांगलीवाडीच्या बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ बस आली. यावेळी बसच्या पुढे बैलगाडी असल्याने चालकाने अचानक रस्त्याचा मार्ग बदलला. त्याचवेळी जोराचा ब्रेक मारला. तसेच रस्त्यावर चिखल असल्याने बस थेट टोल नाक्यातील पत्र्यातील शेडवर जावून आदळली. बसमधील चालक व महिला वाहकासह प्रवासी जखमी झाले. यातील महिला वाहक बी. बी. खोत गंभीर जखमी झाल्या. बसमधून 50 प्रवाशी प्रवास करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अपघातानंतर घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच जखमींच्या नातेवाईकांनी रुग्सणालयात धाव घेतली. एस. टी. महामंडळाचे अधिकारीही रुग्णालयात आले. जखमी सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

मिरज | देव्हाऱ्यातील मुर्ती चोरणाऱ्या वृध्द महिलेला अटक

Next Post

सांगलीत मुलांना अन्नातून विषबाधाप्रकरणी महिला बचत गटावर फौजदारी..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बनावट कागदपत्राच्या आधारे घर हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

सांगलीत मुलांना अन्नातून विषबाधाप्रकरणी महिला बचत गटावर फौजदारी..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group