• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sangli: अवैधरित्या पिस्तुल विक्री करणारा संशयित कडेगावात जेरबंद; दोन पिस्तुल जप्त

Admin by Admin
July 15, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
Sangli: अवैधरित्या पिस्तुल विक्री करणारा संशयित कडेगावात जेरबंद; दोन पिस्तुल जप्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : कडेगाव एमआयडीसी परिसरात दोन पिस्तुले विक्रीच्या तयारीत असलेल्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सुरज जगन्नाथ मोहिते (वय २१, रा. सोहोली ता. कडेगाव) असे संशयिताचे नाव आहे.

त्याच्याकडून दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे असा एक लाख एक हजार ७२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित मोहिते हा कडेगाव एमआयडीसी परिसरात दोन पिस्तूल घेऊन विक्रीच्या तयारीने आला आहे. कऱ्हाड रोडवर त्याला पथकाने शिताफीने पकडून त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या कमरेला खोचलेली दोन पिस्तुले मिळून आली. त्याच्याकडून एक लाख रुपये किंमतीचे पिस्तुले, दिड हजारांची जिवंत काडतुसे आणि रोकड असा माल जप्त करण्यात आला.

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, कुमार पाटील, विक्रम खोत, सागर लवटे, दरीबा बंडगर, सागर टिंगरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

आ. सतेज पाटील यांनी आमच्यासोबत यावे : ना. हसन मुश्रीफ

Next Post

अजितदादा सत्तेत आल्यामुळे काही शंका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अजितदादा सत्तेत आल्यामुळे काही शंका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

अजितदादा सत्तेत आल्यामुळे काही शंका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group