• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आ. सतेज पाटील यांनी आमच्यासोबत यावे : ना. हसन मुश्रीफ

Admin by Admin
July 15, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
आ. सतेज पाटील यांनी आमच्यासोबत यावे : ना. हसन मुश्रीफ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासूनचे आपले मित्र असलेले आ. सतेज पाटील यांना आपण आमच्यासोबत म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत येण्याबाबत खासगीत सल्ला देणार आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाल्यास आपण चांगले काम करू तसेच जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचाही प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळाचे शुक्रवारी दुपारी खातेवाटप जाहीर झाले. मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खाते मिळाले. त्यानंतर बोलताना मुश्रीफ म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांपासून आपली व आ. सतेज पाटील यांची मैत्री आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आम्ही अनेक निवडणुका एकत्र लढविल्या आहेत. आगामी विधानसभा, लोकसभेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाटील सोबत आले, तर मित्र राहू. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची विचारधारा एकच आहे. त्यामुळे आपण त्यांना खासगीत आमच्यासोबत येण्याची खुली ऑफर दिल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अडचणी समजून घेऊन त्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. विशेष सहाय्य आपल्या आवडीचे खाते आहे. बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी संजय गांधी निराधार योजना सुरू केली होती. आपण विशेष सहाय्य मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये त्यातील अनेक त्रुटी दूर करून या योजनेचा विस्तार केला. त्याचा लाभ अनेक निराधार, दिव्यांगांना होत आहे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Previous Post

महाराष्ट्र पुन्हा हादरला; बुलढाण्यात आठ जणांनी केला महिलेवर सामूहिक बलात्कार

Next Post

Sangli: अवैधरित्या पिस्तुल विक्री करणारा संशयित कडेगावात जेरबंद; दोन पिस्तुल जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Sangli: अवैधरित्या पिस्तुल विक्री करणारा संशयित कडेगावात जेरबंद; दोन पिस्तुल जप्त

Sangli: अवैधरित्या पिस्तुल विक्री करणारा संशयित कडेगावात जेरबंद; दोन पिस्तुल जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group