• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दुबार फेरफार प्रकरणी चौकशी करून कारवाई करा

राष्ट्रवादीच्या डी एस देशमुख यांची कडेगाव प्रांतधिकाऱ्यांकडे मागणी

Admin by Admin
July 8, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव :- कडेगाव उपविभागात दुबार नोंदी बाबत गोपनीय खबऱ्याने वृत्त मालिका सुरु केल्यानंतर राष्ट्रवादीचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष व पाणी संघर्ष चळवळीचे नेते डी एस देशमुख यांनी शुक्रवार दि 7 जुलै रोजी प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन बेकायदेशीर पणे दुबार नोंदी धरणाऱ्या तलाठयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

डी एस देशमुख यांनी खबऱ्याच्या वृत्तानंतर वैयक्तिक चौकशी करून मोहिते वडगाव चे तलाठी यांनी बेकायदेशीर पणे दुबार नोंदी धरल्याची मिळवली.यामध्ये संबंधित तलाठी यांनी बेकायदेशीर पणे दुबार नोंदी धरून शासकीय नियमांची पायमल्ली केली असल्याचे समोर आले.त्यामुळे गोपनीय खबऱ्याने सुरु केलेल्या वृत्त मालिकेत सत्यता असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्यांनी याबाबत प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन निवेदन देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे खबऱ्याला सांगितले. त्यानुसार शुक्रवार दि 7 जुलै रोजी डी एस देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जगदीश महाडीक कडेगाव शहर अध्यक्ष प्रवीण करडे यांनी प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला तसेच लेखी निवेदन देऊन आपल्या मार्फत योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

निवेदनात म्हणलं आहे कि, मोहिते वडगावचे तलाठी यांनी 2006 साली रद्द केलेल्या फेरफार मधील नोंद 2023 मध्ये दुबार धरली आहे. ही नोंद जाणीवपूर्वक आणि आर्थिक अमिषापोटी धरल्याचे दिसत आहे. रद्द झालेल्या किंवा केलेल्या फेरफारबाबत आपलेकडे रीतसर अपील करून दाद मागणे क्रम प्राप्त असताना तलाठी यांनी बेकायदेशीर पणे हे कृत्य केले आहे. अशा बेकायदेशीर वृत्तीना वेळीच आळा घालने गरजेचे आहे. संबंधित तलाठी यांचे संपूर्ण दप्तराची तपासणी करणे गरजेचे आहे तसेच त्यांचेवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात कोणताही तलाठी अशाप्रकारे बेकायदेशीर पणे कोणतंही कृत्य करणार नाही.आपण निवेदनाबाबत तातडीने कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे अन्यथा लोकशाही मार्गाने जन आंदोलन करण्याच्या पर्यायाचा अवलंब करावा लागेल.

गोपनीय खबऱ्याचे वृत्त आणि पहिला मासा गळाला

गोपनीय खबऱ्याने कडेगाव उपविभागात काही तलाठयांनी बेकायदेशीर पणे दुबार नोंदी धरल्या असल्याबाबत पहिल्यांदा वृत्त प्रकाशित केल होतं त्यानुसार राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष डी एस देशमुख यांनी माहिती घेतली असता मोहिते वडगाव येथे बेकायदेशीर पणे दुबार नोंदी धरल्या असल्याचे समोर आलं. वैशिष्ट्य म्हणजे काही मंडळी खबऱ्याच्या वृत्तामध्ये कसलेच तथ्य नाही अशा वल्गना करीत होते मात्र आता डी एस देशमुख यांनी पुराव्या सह प्रांताधिकारी यांचेकडे कारवाईची मागणी करणारे निवेदन दिल्याने पहिला मासा तरी गळाला लागला असल्याची भावना जनमानसातून उमटू लागली आहे. आता कडेगावचे प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांचेकडे उपविभागातील जनतेचे लक्ष लागून राहील आहे.

Previous Post

नीलम गोऱ्हे यांच्या नाराजीवर सुषमा अंधारे यांचा निशाणा; म्हणाल्या, ‘आरोग्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा. ‘

Next Post

धक्कादायक! मध्यरात्री एका टोळक्याने केला पोलिसांवर गोळीबार, एक पोलीस जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक! मध्यरात्री एका टोळक्याने केला पोलिसांवर गोळीबार, एक पोलीस जखमी

धक्कादायक! मध्यरात्री एका टोळक्याने केला पोलिसांवर गोळीबार, एक पोलीस जखमी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group