• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भ्रष्ट तलाठ्यांच्या विरोधात आज एलगार

राष्ट्रवादीचे डी एस देशमुख प्रांतधिकाऱ्यांना निवेदन देणार

Admin by Admin
July 7, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले

कडेगाव:- कडेगाव तालुक्यात बेकायदेशीरपणे दुबार नोंदी धरून भ्रष्टाचार करणाऱ्या काही भ्रष्ट तलाठयांच्या विरोधात आज एलगार पुकारला जाणार आहे. पाणी संघर्ष चळवळीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा आंदोलन फेम डी एस देशमुख आज कडेगावचे प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. निवेदनाद्वारे भ्रष्ट तलाठयांच्यावर कठोर कारवाईची मागणी देशमुख करणार आहेत. त्यामुळे भ्रष्ट कारभार करणाऱ्या तलाठयांचे धाबे दणाणले आहेत.

तालुक्यात इमानदारीने आणि प्रामाणिकपणे काम करणारे अनेक तलाठी आहेत. परंतु काही थोड्या भ्रष्ट लोकांमुळे सर्वसामान्य जनतेचा तलाठयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. आजही अनेक तलाठी आपलं कर्तव्य अगदी निष्ठेने पार पाडत असल्याचे पहावयास मिळते. मात्र इमानदारीने काम करणाऱ्या लोकांच्या तोंडावर भ्रष्ट काम करणारे लोकं ज्या टेम्ब्याने फिरतात त्यामुळं आपणही प्रामाणिक पणा सोडावा, अशी भावना चांगल्या लोकांच्या मनात आल्या वाचून राहत नाही. आणि नेमकं हेच थांबवायचं असेल तर भ्रष्ट लोकांना शिक्षा झाली पाहिजे, ह्या उद्देशाने देशमुख आज प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांना भेटून निवेदन देणार आहेत.

डॉ देशमुख हे संबंधित निवेदनाच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता व प्रामाणिक पणे काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे.

Previous Post

एपीआय शिंदेंचा दणका : संखमध्ये ऊसाच्या शेतात गांजाची लागवड; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; पोलिसांची धडक कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; पोलिसांची धडक कारवाई

वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; पोलिसांची धडक कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group