• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकींग | समरजीतसिंह घाटगेंनी जाहीर केली भूमिका! मुश्रीफांविरोधात ठोकला शड्डू

Admin by Admin
July 6, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकींग | समरजीतसिंह घाटगेंनी जाहीर केली भूमिका! मुश्रीफांविरोधात ठोकला शड्डू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कागलचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळं कोल्हापुर ग्रामीणच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुश्रीफांविरोधात भाजपकडून लढण्यास तयारी करुन बसलेले कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे नॉट रिचेबल झाले होते.

तसेच आपण कुटुंबियांशी चर्चा करुन लवकच निर्णय जाहीर करु असं म्हणत भाजपला इशारा दिला होता. यानंतर आज समरजितसिंह घाटगे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपली भूमिका जाहीर केली.

भाजपच्या कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे नाराज आहेत. कागलमधून आपण हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणुक लढवणार आणि जिंकणार अशी घोषणा घाटगे यांनी केली. कागलमध्ये त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्यांच्या सभेला शेकडो कार्यकर्ते हजर होते. दोनच दिवसांपूर्वी आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावरुन आपण भाजपतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

घाटगे म्हणाले, “मी येतानाच गुलाबी कुर्ता घालून आलो आहे. त्यामुळं मी आज इथं घोषित करतो की, आपल्या विजयाचं भूमिपुजन इथं झालेलं आहे. आमदारकी नुसती लढणारच नाही तर रेकॉर्ड मार्जिननं जिंकणार. राज्यात ज्या काही घडामोडी झाल्यात एकदम करेक्ट झाल्यात. आपण सर्वांनी एक शपथ घ्यायची आहे की, ऑक्टोबर २०२४ला रेकॉर्ड मार्जिननं कागलचा कोंढाणा परत घ्यायचा. उद्यापासून कागलच्या परिवर्तनासाठी कामाला लागा. परिवर्तन झालंय आता सर्वांनी मार्जिन ठरवा कागलचा कोंढाणा आपण घेऊ”

Previous Post

Sangli News : बनेवाडी – मोतीपिर खिंडी रस्त्यावर पाेलिसांनी रचला सापळा, गुटख्यासह 2 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात

झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group