सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी या गावात पोलिसांनी एक लाख 58 हजार 740 रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूसह दोन लाख 50 हजार रुपये किमतीची कार जप्त केली आहे.
पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील बनेवाडी येथील सरकारी दवाखान्याच्या समोरील बनेवाडी ते मोतीपिर खिंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रतिबंधित मालासह असणाऱ्या गुटख्याची (gutkha) उमाजी जनार्दन जाधव (वय 37, राहणार बनेवाडी) वाहतूक करीत आहेत.
पाेलिसांनी कार येताच ती अडवली. या कारची पाेलिसांनी तपासणी केली. या कारमध्ये पाेलिसांना प्रतिबंधित असणाऱा गुटखा व सुगंधी तंबाखू आढळून आली. त्यानंतर पाेलिसांनी प्रतिबंधित मालासह कार व संशयितास ताब्यात घेतले. पाेलिसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार या कारवाईत दोन लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

