• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अब तेरा क्या होगा दाढीया ! शपथविधीनंतर कोणी केली टीका पाहा

Admin by Admin
July 2, 2023
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंत्री पदाची शपथ घेऊन धक्का दिला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना काहीसा आनंद वाटला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडोखोरी करीत राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पाडल्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांना उकळी फुटली आहे. आमची वाट लागली आता तुम्ही भोगा असाच यात आविर्भाव दिसत आहे. राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी लगोलग मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर शिवसेनेत उभी फूट पाडून भाजपाशी हातमिळवणी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी वर्षभर वाट पहावे लागत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा रविवार राजकीय भूंकपाचा ठरला. गेल्या तीन साडे तीन वर्षांत शरद पवार यांचे नाराज पुतणे अजित पवार यांनी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि राजभवन पुन्हा एकदा गजबजून गेले. राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंत्री पदाची शपथ घेऊन धक्का दिला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना काहीसा आनंद वाटला आहे. कारण शिवसेनेशी गद्दारी करीत भाजपाशी हातमिळवणी करणारे एकनाथ शिंदे यांचे आता काही खरं नाही याचा आनंद शिवसेना नेत्यांना होत होता. कारण त्याच्या प्रतिक्रीया पाहून तर असेच वाटत होते की, वैवध्य आले म्हणून काय झाले सवत तर मेली असाच त्यांचा आविर्भाव होता.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवर भाष्य करीत अजित पवार आणि त्यांचे साथीदार शपथ घेताना एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडल्याचे सांगत आता शिंदे यांची भाजपाला गरज नाही कारण हे सर्व 16 आमदार सुनावणीत अपात्र ठरणार म्हणून ही खेळी भाजपाने केल्याचा आरोप केला. आणि गेलेले आमदारही आता अपात्र ठरतील अशी भविष्यवाणी त्यांनी केली.

तर दुसरीकडे अजित पवार यांचा शपशविधी होताच शिवसेना गटाच्या फायर ब्रॅंड नेत्या सुषमा अंधारे यांनी लागलीच ट्वीटर वर पोस्ट टाकीत अब तेरा क्या होगा दाढीया ! असा सुर लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे आपले पक्षाची अवस्थेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचं आता काही खरं नाही अशी भावनाच त्यांच्या वक्तव्यावरुन दिसत आहे.

Previous Post

‘मी खंबीर आहे, नव्याने उभं करू’, शरद पवार यांची खबऱ्याला सर्वात पहिली प्रतिक्रिया

Next Post

कडेगाव तालुक्यात महसूल प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा कळस?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : वाळूचोरीची बोगस चौकशी ; “त्या” तहसीलदारासह पंचनामा करणाऱ्या पथकाचीच होणार चौकशी.

कडेगाव तालुक्यात महसूल प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा कळस?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group