• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

साताऱ्यात दोन्ही राजे आमनेसामने..

Admin by Admin
June 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
साताऱ्यात दोन्ही राजे आमनेसामने..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सातारा – संभाजीनगर ग्रामपंचायत हद्दीत बाजार समितीच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या मुद्‌द्‌यावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे बुधवारी सकाळी आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता.

दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने, परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांची कसरत झाली. त्या ठिकाणी उभारलेली शेड जेसीबीने पाडून उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोध डावलून शिवेंद्रसिंहराजेंनी भूमिपूजनाचा नारळ फोडला. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

संभाजीनगर येथील जागेत सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते होणार होते. त्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वी सकाळीच उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी तेथील साहित्य फेकून दिले. उदयनराजेदेखील थोड्याच वेळात तिथे पोहोचले. त्यांच्यासमोर समर्थकांनी तेथील शेड जमीनदोस्त केले. या घटनेमुळे दोन्ही राजांमध्ये आगामी काळात जोरदार संघर्ष होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. येथे कुळांची जागा आहे. येथे बाजार समितीची इमारत कशी होऊ शकते? ही जागा माझी आहे. तेथे कोणी आले, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशारा उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या समर्थकांना दिला. मात्र, थोड्याच वेळात शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, संचालक तेथे आले.कुळांच्या जागेत तुम्ही बाजार समितीची इमारत कशी उभी करू शकता,

असा सवाल उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना केला. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बाजार समितीच्या बाजूने झाले आहेत. या जागेचा सातबारा उतारा बाजार समितीच्या नावे झाला आहे. येथे इमारत होणारच, असा पवित्रा शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला. तुमच्याकडे काही कायदेशीर कागदपत्रे असतील, तर ती सादर करावीत. आमची बाजू कायदेशीर आहे.

हा प्रश्‍न कायदेशीर मार्गाने सोडवावा, असे त्यांनी ठणकावले. ही खडाजंगी सुरू असताना जमिनीचे वहिवाटदार तेथे अचानक उपस्थित झाले. ही जमीन आमची आहे. आम्ही येथे कोणालाही पाय ठेवू देणार नाही. उदयनराजे आमचे नेते आहेत, असे म्हणत त्यांनी घोषणाबाजी केली. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शहा यांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी दोन्ही नेत्यांची समजूत घातली. या गोंधळातच शिवेंद्रराजे यांनी तेथे भूमिपूजन केले. कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी केली. त्यावर, उदयनराजेंनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हे काय चाललंय, असा उद्विग्न प्रश्‍न केला. त्याच वेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि धक्काबुक्की सुरू झाली. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले.

यावेळी संभाजीनगरच्या माळावर प्रचंड गर्दी झाली होती. शिवेंद्रराजे आणि त्यांचे कार्यकर्ते तेथून निघून गेल्यावर, उदयनराजेंनी तेथे कुदळ मारुन, विकासकामांचे भूमिपूजन झाल्याचे जाहीर केले. संभाजीनगर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनीही तेथे विकासकामांचे नारळ फोडले आणि घोषणाबाजी केली. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. दरम्यान, पोलीस निरीक्षक हेमंत शहा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याची सूत्रे नुकतीच स्वीकारली आहेत. साताऱ्यात काम करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे, याची प्रचिती त्यांना लगेचच आली; परंतु अनुभव पणाला लावून त्यांनी दोन्ही राजांमध्ये मध्यस्थी केली.

Previous Post

“आता भावी मुख्यमंत्री नको पाच अक्षरी नाव हवे”, फडणवीसांच्या उपस्थितीत टाळ्यांचा कडकडाट…

Next Post

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हांडोरेला अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हांडोरेला अटक

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हांडोरेला अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group