• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीला अटक

Admin by Admin
June 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीला अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीतील दोन महिलासह चौघांना पुणे-बंगळूर महामार्गावरील आणेवाडी पथकर नाक्यावर पकडण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी दिली.त्यांच्याकडून लुटीतील साडे बारा लाख जप्त करण्यात आले आहेत.

स्वस्तात सोने देतो असे सांगून पुण्यातील व्यापारी मयूर जैन यांना मंगळवारी सांगलीतील फळमार्केट जवळ बोलावले.अशोक रेड्डी याच्यासह अन्य सहकाऱ्यांच्या टैळीने सोन्याचे बिस्किट दाखवून विश्वास संपादन केला. २५ लाख रुपये घेतले, मात्र सोने न देता पोलीस आल्याचे सांगत पोबारा केला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच तातडीने सातारा पोलीसांना कळवण्यात आले. संशयित पुण्याच्या दिशेने जात असल्याचे सांगितले.

भुईंज पोलीसांनी आणेवाडी येथे नाकाबंदी केली. जीपमधून ( एमएच १२ पीझेड ७९९२) जात असलेल्या चौघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता लुटीतील साडेबारा लाख रुपये मिळाले. यातील संशयित प्रशांत निंबाळकर (वय ४८, रा. नांदूर, जि. बुलढाणा), प्रवीण खिराडे (वय ३७, रा. खामगाव, जि. बुलढाणा), मानसी शिंदे व नम्रता शिंदे (दोघी रा. सारोळा, ता.मुळशी) यांना अटक करण्यात आली आहे. चौघांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. लुटीतील उर्वरीत रक्कम हस्तगत करण्याचे व टोळीतील अन्य संशयितांना पकडण्याचे पोलीसांचे प्रयत्न सुरु आहेत.

Previous Post

अजित पवार प्रदेशाध्यक्ष तर जयंत पाटील विरोधी पक्षनेते होणार..

Next Post

“आता भावी मुख्यमंत्री नको पाच अक्षरी नाव हवे”, फडणवीसांच्या उपस्थितीत टाळ्यांचा कडकडाट…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“आता भावी मुख्यमंत्री नको पाच अक्षरी नाव हवे”, फडणवीसांच्या उपस्थितीत टाळ्यांचा कडकडाट…

"आता भावी मुख्यमंत्री नको पाच अक्षरी नाव हवे", फडणवीसांच्या उपस्थितीत टाळ्यांचा कडकडाट...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group